भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेत रंगणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यानंतर भारतीय संघाने शानदार खेळ करत मालिकेतील पुढील ३ सामने जिंकले आणि मालिकेत ३-१ ने भक्कम आघाडी घेतली. भारतीय संघाने ही मालिका तर जिंकली आहे. मात्र तरीदेखील शेवटचा कसोटी सामना भारतीय संघासाठी महत्वाचा का असणार आहे? काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या.
अंतिम सामना महत्वाचा का?
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंडला धक्का बसला. कारण भारतीय संघ पहिल्या स्थानी पोहोचला. भारतीय संघाला ही मालिका ४-१ ने जिंकावी लागणार आहे. कारण यापुढे भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. २०२४ च्या शेवटी भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. (Cricket news in marathi)
पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे आव्हान भारतीय संघासाठी मुळीच सोपं नसणार आहे. त्यामुळे भारतीय संघ इंग्लंडला हरवून गुणतालिकेत आपली स्थिती आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याची संधी..
भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. म्हणजे पुढील काही सामने जिंकले तर भारतीय संघाला पुन्हा एकदा फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. भारतीय संघाने यापूर्वीही दोन वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र २०२१ मध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.