Team India Playing 11: प्लेइंग ११ चा तिढा सुटेना! कुलदीप की आकाश दीप कोणाला मिळणार स्थान?
Team India Playing 11 For IND vs ENG 5th Test:
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना धरमशालेत रंगणार आहे. मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. कारण चौथ्या सामन्यात विश्रांती देण्यात आलेला जसप्रीत बुमराह या सामन्यातून कमबॅक करणार आहे. दरम्यान रोहित शर्मासमोर असलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणाला बसवायचं आणि कोणाला खेळवायचं.
मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये पार पडला. या सामन्यात बुमराहला खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. या सामन्यात आकाशदीपला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचे गोलंदाज फ्लॉप ठरले.
अशा खेळपट्टीवर पदार्पणवीर आकाश दीपची धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्याने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं होतं. तर कुलदीप यादवने २२ धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने शानदार विजय साकारला. (Cricket news in marathi)
हा कसोटी सामना आर अश्विनसाठी अतिशय खास असणार आहे. कारण हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. तर दुसरीकडे रविंद्र जडेजा देखील शानदार कामगिरी करतोय. त्यामुळे रोहित या दोघांनाही बसवण्याची रिस्क घेणार नाही.
हे दोन्ही फिरकी गोलंदाज खेळणार असतील तर कुलदीप यादवला विश्रांती देण्याशिवाय पर्याय नाही. धरमशाळेत जर भारतीय संघ २ फिरकी आणि ३ वेगवान गोलंदाजांसह उतरण्याच्या विचारात असेल तर आर अश्विन,रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप हे ५ गोलंदाज प्लेइंग ११ मध्ये असू शकतात.
भारतीय संघ आघाडीवर..
भारतीय संघाने या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने पुढील तिन्ही सामन्यांमध्ये जोरदार विजय मिळवला आहे. या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.