भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विनच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या राजकोट कसोटीत ५०० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.
तो भारतासाठी ५०० गडी बाद करणारा दुसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे यांनी हा कारनामा करुन दाखवला होता. यासह कसोटी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करणारा तो जगातील ९ वा गोलंदाज ठरला आहे.
श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधनने हा कारनामा १४४ डावात केला होता. तर आर अश्विनने हा कारनामा १८४ डावात केला आहे. याबाबतीतही त्याने अनिल कुंबळे यांना मागे सोडलं आहे. अनिल कुंबळे यांनी हा कारनामा १८६ डावात केला होता.
तर आर अश्विनने हा कारनामा १८४ डावात करुन दाखवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नने २०१ डावात ५०० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. तर ग्लेन मॅकग्राने हा कारनामा २१४ कसोटी सामन्यांमध्ये करुन दाखवला. (Cricket news in marathi)
याबाबतीतही अनिल कुंबळेंना सोडलं मागे..
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडू फेकून ५०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे. ग्लेन मॅकग्राने २५५२८ चेंडू फेकून ५०० गडी बाद केले होते. या यादीत आर अश्विन दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
आर अश्विनने २५७१४ चेंडू हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तर इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने २८१५० चेंडू फेकून हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. त्याचाच सह गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने २८४३० आणि वेस्टइंडिजचा दिग्गज गोलंदाज कर्टनी वॉल्शने हा कारनामा २८८३३ चेंडू फेकून केला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करणारे गोलंदाज..
मुथय्या मुरलीधरन- ८००
शेन वॉर्न- ७०८
जेम्स अँडरसन- ६९६
अनिल कुंबळे - ६१९
स्टुअर्ट ब्रॉड- ६०४
ग्लेन मॅकग्रा -५६३
कर्टनी वॉल्श- ५१९
नॅथन लायन- ५१७
आर अश्विन - ५००*
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.