R Ashwin Record: अनिल कुंबळेंचा महारेकॉर्ड मोडण्यापासून अश्विन काही पावलं दूर! 500 विकेट्ससह हे मोठे रेकॉर्ड्सही मोडणार

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील तिसरा कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे
R ashwin
R ashwin saam tv news
Published On

R Ashwin Can Break Anil Kumble Record:

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील तिसरा कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे.मालिकेतील सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला १०६ धावांनी धूळ चारत मालिकेत १-१ ची बरोबरी साधली. मालिकेतील तिसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यात आर अश्विनकडे (R Ashwin) इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

आर अश्विन हा अनिल कुंबळेनंतर भारताचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज आहे. त्याला भारतात कसोटी क्रिकेट खेळताना सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे. सध्या हा रेकॉर्ड अनिल कुंबळेंच्या नावावर आहे.

अनिल कुंबळे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारतात खेळताना ३५० गडी बाद केले आहेत. तर आर अश्विनने भारतात खेळताना ३४६ गडी बाद केले आहेत. त्याला अनिल कुंबळेंचा रेकॉर्ड मोडून काढण्यासाठी केवळ ५ गडी बाद करण्याची गरज आहे. यासह तो भारतात कसोटी क्रिकेट खेळताना सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरु शकतो. (Cricket news in marathi)

R ashwin
IND vs ENG 3rd Test: सरफराजचं पदार्पण होणार! या युवा खेळाडूलाही मिळणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज..

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी दरम्यान आर अश्विनने भारत- इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. हा रेकॉर्ड माजी भारतीय गोलंदाज चंद्रशेखर यांच्या नावावर होता. तर आर अश्विनने त्यांना मागे सोडत ९७ गडी बाद केले आहेत.

R ashwin
IND vs ENG, Test Series: राजकोट कसोटीत केएस भरतची होणार सुट्टी! या खेळाडूला मिळणार संधी

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या या मालिकेत आर अश्विनच्या गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळाला आहे. त्याने या मालिकेत गोलंदाजी करताना ९ गडी बाद केले आहेत. त्याने हैदराबाद कसोटीतील दोन्ही डावात मिळून ६ गडी बाद केले होते. तर विशाखापट्टनम कसोटीत त्याने ३ गडी बाद केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com