IND vs ENG, Test Series: राजकोट कसोटीत केएस भरतची होणार सुट्टी! या खेळाडूला मिळणार संधी

KS Bharat: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे.
ks bharat
ks bharat twitter
Published On

India vs England, 3rd Test:

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. ५ कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे राजकोट कसोटी मालिकेत आघाडी घेण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला विश्रांती दिली जाऊ शकते.

केएस भरतला सातत्याने संधी दिली जात आहे. मात्र तो या संधीचं सोनं करु शकत नाहीये. बीसीसीआयच्या एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत म्हटले की, केएस भरतला आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र यादरम्यान तो साजेशी कामगिरी करु शकलेला नाही.

ks bharat
Ind Vs ENG Test: शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा, विराट कोहली, श्रेय्यस अय्यरला विश्रांती, २ दिग्गजांचे पुनरागमन

ते म्हणाले की, ‘केएस भरतची फलंदाजीतील आणि यष्टीरक्षण करताना केलेली कामगिरी निराशाजनक आहे. त्याला संधी मिळतेय मात्र या संधीचा तो पुरेपूर फायदा घेऊ शकत नाहीये. तर दुसरीकडे ध्रुव जुरेल शानदार आहे. त्याची वागणूक चांगली आहे. त्याचं भविष्य उज्वल आहे. त्याने देशातंर्ग क्रिकेटमध्ये यूपी संघासाठ, भारतीय अ संघ आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी दमदार खेळ केला आहे. जर त्याला राजकोट कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको.’ ( Cricket news in marathi)

ks bharat
IND vs AUS, U-19 WC Final: फक्त एक चेंडू... टीम इंडियाच्या पराभवासाठी नेमका कोणता ठरला टर्निंग पॉईंट?

केएस भरतचा फ्लॉप शो सुरुच..

केएस भरतला या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही कसोटीत खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला आहे. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात तो ४१ आणि १८ धावा करत माघारी परतला.

तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो १७ आणि केवळ ६ धावा करत माघारी परतला. भारतीय संघाला अशा एका यष्टीरक्षक फलंदाजाची गरज आहे, जो उत्तम यष्टीरक्षणासह फलंदाजीतही मोलाचं योगदान देईल. केएस भरतने फलंदाजीसह यष्टीरक्षणातही बऱ्याच चुका केल्या आहेत. त्याने स्टंपिंग आणि काही झेलही सोडल्या.

तर दुसरीकडे ध्रुव जुरेलचा रेकॉर्ड पाहिला तर, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १५ सामन्यांमध्ये ४६.४७ च्या सरासरीने ७९० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतक झळकावले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २४९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com