Ind Vs ENG Test: शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा, विराट कोहली, श्रेय्यस अय्यरला विश्रांती, २ दिग्गजांचे पुनरागमन

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. आज बीसीसीआयने उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
IND vs AUS 1st Test Rohit Sharma
IND vs AUS 1st Test Rohit SharmaTwitter
Published On

IND Vs ENG Test Series:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. आज बीसीसीआयने उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये आघाडीचा फलंदाज विराट कोहली, श्रेय्यस अय्यरला वगळण्यात आले आहे तर रविंद्र जडेजा आणि के. एल राहुल यांनी पुन्हा एकदा संघात पुनरागमन केले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरू होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील चुरशीच्या लढतीनंतर आता मालिकेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारतीय निवड समितीने यासाठी 17 खेळाडूंची निवड केली आहे. रोहित शर्माची (Rohit Sharma) संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इंग्लंडविरुद्धच्या गेल्या तीन कसोटी सामन्यांपासून (IND vs ENG) टीम इंडियातून बाहेर आहे. दुखापतीमुळे त्याला भारतीय निवड समितीने विश्रांती दिली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर श्रेयस अय्यरने ताण आणि पाठदुखीची तक्रार केली होती. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. याशिवाय विराट कोहलीही (Virat Kohli) या मालिकेचा भाग नाही. त्याचवेळी रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. मात्र, या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

IND vs AUS 1st Test Rohit Sharma
Pathum Nissanka Double Century: पथुम निसंकाने रचला इतिहास! वनडेत डबल सेंच्युरी मारणारा ठरला श्रीलंकेचा पहिलाच फलंदाज

असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (डब्ल्यूके), केएस भरत (डब्ल्यूके), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IND vs AUS 1st Test Rohit Sharma
Ulhasnagar Crime News : राहुल जयस्वाल खून प्रकरणी रॉबिन करोतियाचा शाेध सुरु, सहा अटकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com