Ulhasnagar Crime News : राहुल जयस्वाल खून प्रकरणी रॉबिन करोतियाचा शाेध सुरु, सहा अटकेत

या घटनेनंतर येथील वाल्मीक नगर, इमलीपाडा तसेच फॉरवर्ड परिसरात खळबळ माजली हाेती. पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने पथक रवाना केले हाेते.
rahul mahendra jaiswal
rahul mahendra jaiswalsaam tv
Published On

Ulhasnagar News :

उल्हासनगर येथे गुरुवारी पहाटे राहुल महेंद्र जयस्वाल (rahul mahendra jaiswal) या युवकाची हत्या झाली हाेती. पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन सहा जणांना अटक केली आहे. एका संशयिताचा तपास सुरु असल्याची माहिती विजय वाघमारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मध्यवर्ती पोलीस ठाणे) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन भागात असलेल्या इमलीपाडा परिसरात राहुल जयस्वाल हा इमलीपाडा परिसरात आला हाेता. त्यावेळी काही तरुणांनी त्याला घेरले आणि त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून त्याला मारहाण केली. त्यांनंतर तरुणांनी त्याच्या डोक्यात कडप्पा लादी घालून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर पाेलिसांनी कसून तपास सुरु केला.

rahul mahendra jaiswal
Kunbi Caste Certificate : 'या' जिल्ह्यात शनिवार, रविवारी कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष शिबिर

या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या पथकाने चोवीस तासाच्या आत विविध ठिकाणी धाडसत्र मोहीम राबवले. या प्रकरणात सहा संशयितांना अटक केली असून तडीपार गुंड रॉबिन करोतिया याचा शाेध सुरु असल्याची माहिती विजय वाघमारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मध्यवर्ती पोलीस ठाणे) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

rahul mahendra jaiswal
Nagar News : विविध मागण्यांसाठी हजारो वकिलांचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com