Virat Kohli: 'विराट बाहेर होणं टीम इंडियासाठी मोठा धक्का..' दिग्गज क्रिकेटपटूने कारणही सांगितलं

Naseer Hussain On Virat Kohli: संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतूनही बाहेर होऊ शकतो. याबाबत बोलताना माजी इंग्लिश कर्णधार नासीर हुसैनने मोठं वक्तव्य केलं आहे.
virat kohli
virat kohliyandex
Published On

IND vs ENG Test Series, Virat Kohli:

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहेत. हैदराबाद कसोटीत इंग्लंडने मैदान मारलं. तर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने दमदार कमबॅक करत इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवला.

या दोन्ही संघांमधील निर्णायक सामना राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतूनही बाहेर होऊ शकतो. याबाबत बोलताना माजी इंग्लिश कर्णधार नासीर हुसैनने मोठं वक्तव्य केलं आहे.

विराट कोहली सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमधून बाहेर झाला होता. आता तो तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतूनही बाहेर होऊ शकतो. याबाबत बोलताना नासीर हुसैन म्हणाला की, ' हा भारतीय संघासह या मालिकेला आणि संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी सर्वात मोठा धक्का आहे. ही मालिका रोमांचक वळणावर आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने रोमांचक होते. विराट कोहलीया खेळातील आणि या मालिकेतील दिग्गज फलंदाज आहे. त्यामुळे विराट सारखा खेळाडू बाहेर होणं कुठल्याही संघासाठी मोठा धक्काच असेल.'

virat kohli
IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या कसोटीत बुमराह खेळणार! KL Rahul अन् Ravindra Jadeja बाबतही समोर आली मोठी अपडेट

विराट कोहली संघाबाहेर असला तरीदेखील ही युवा खेळाडूंसाठी उत्तम संधी असणार आहे. याबाबत बोलताना नासीर हुसैन म्हणाला की,'आगामी कसोटी मालिकेतून विराट कोहली बाहेर होणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का तर आहेच मात्र भारतीय संघात उत्कृष्ट युवा फलंदाज आहेत. ज्यांनी शानदार कामगिरी केली आहे. केएल राहुलने गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघासाठी दमदार खेळ करुन दाखवला आहे. मला असं वाटतं की तो तिसऱ्या कसोटीत कमबॅक करेल आणि संघासाठी दमदार कामगिरी करेल. (Cricket news in marathi)

virat kohli
IND vs ENG Test Series: शेवटच्या ३ सामन्यांसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा! हे २ स्टार खेळाडू करू शकतात कमबॅक

मालिकेतील सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराटला संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्याऐवजी रजत पाटीदारला संघात स्थान दिलं गेलं. विराट कोहली पुढील २ सामन्यांमधून बाहेर होण्याची चर्चा सुरु आहे. मात्र अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com