भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test Series) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने बाजी मारली. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक करत इंग्लंडला हरवलं.
सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा सामना येत्या १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यामुळे बुमराहसारखा अनुभवी गोलंदाज संघात असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथ्या सामन्यात बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती दिली जाऊ शकते. हा सामना २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान रांचीमध्ये रंगणार आहे. हैदराबाद आणि विशाखापट्टनममध्ये झालेल्या कसोटीत जसप्रीत बुमराह हा संघाचा हुकमी एक्का ठरला आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याला बसवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे. (Latest cricket news in marathi)
केएल राहुल परतणार?
मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला. के एल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. मात्र तो तिसऱ्या कसोटीत कमबॅक करताना दिसून येणार आहे. त्यामुळे रजत पाटीदारला विश्रांती दिली जाऊ शकते. तर श्रेयस अय्यरला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. यासह रविंद्र जडेजाही या सामन्यात कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्कलोड मॅनेज करण्यासाठी दुसऱ्या कसोटीतून विश्रांती दिली गेली होती. आता तो तिसऱ्या कसोटीत कमबॅक करताना दिसेल. त्यामुळे मुकेश कुमारला विश्रांती दिली जाऊ शकते. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत २-१ ची आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.