Jasprit Bumrah: सटीक यॉर्कर कसा पडतो? 'मॅन ऑफ द मॅच'ची ट्रॉफी घेताना बुमराहाने सांगितलं सीक्रेट

Jasprit Bumrah: सटीक यॉर्कर कसा पडतो? 'मॅन ऑफ द मॅच'ची ट्रॉफी घेताना बुमराहाने सांगितलं सीक्रेट

India vs England 2nd Test : जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ३ बळी घेतले होते. बुमराहला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी 'सामनावीर' म्हणून निवडण्यात आलं. कसोटी सामन्यानंतर जसप्रीत बुमराहने त्याच्या गोलंदाजी तंत्राबद्दल माहिती दिली.
Published on

Jasprit Bumrah Yoker Bowler :

विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला १०६ धावांनी पराभूत केलं. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारत आणि इंग्लंडच्या संघाने १-१ अशी बरोबरी केलीय. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीला होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामना जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅचने गौरवण्यात आलं. या सामन्यादरम्यान बुमराहच्या यॉर्कर चेंडूची खूप चर्चा झाली. (Latest News)

बुमराह योग्य यॉर्कर कसा काय टाकतो याचं सीक्रेट स्वत: त्यानेच उघड केलंय. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा फलंदाज ऑली पोपला यॉर्करने बाद केले होते. पोप बाद झालेला यॉर्कर चेंडू हा सर्वश्रेष्ठ यॉर्कर होता. बुमराहचा यॉर्कर पोप खेळताच आला नव्हता.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यॉर्करवर बुमराहने गुपित उघड केलं

भारतीय संघाचा यॉर्कर किंग म्हटल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहचा अचूक यॉर्कर खेळणे जगातील कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नाही. बुमराह एका षटकात सहाच्या सहा चेंडू यॉर्कर टाकू शकतो. बहुतेक फलंदाजांना बुमराहच्या यॉर्कर चेंडूवर फलंदाजी करता येत नाही. जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ३ बळी घेतले होते.

बुमराहला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी 'सामनावीर' म्हणून निवडण्यात आलं. कसोटी सामन्यानंतर जसप्रीत बुमराहने त्याच्या गोलंदाजी तंत्राबद्दल माहिती दिली. यॉर्करबाबत बुमराह म्हणाला की, जेव्हा मी गोलंदाजी शिकत होतो तेव्हा यॉर्कर हा पहिला चेंडू कसा टाकला जातो ते शिकलं. तसेच मी अनेक महान गोलंदाजांची गोलंदाजी पाहायचो आणि ते यॉर्कर चेंडू कसे टाकतात ते पाहत होतो.

जसप्रीत बुमराह जेव्हा लहान होता तेव्हा तो पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम, वकार युनूस आणि भारताच गोलंदाज जहीर खान यांची गोलंदाज पाहत असायचा असं बुमराह म्हणाला. या खेळाडूंची गोलंदाजी पाहून त्याने गोलंदाजीचे कौशल्य आत्मसात केले. उपकर्णधार जसप्रीत बुमराहने कर्णधार रोहित शर्माबद्दल म्हणाला की, मी रोहित शर्मासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे आणि सामन्यादरम्यान त्याला मदत करणे ही माझी जबाबदारी आहे.

Jasprit Bumrah: सटीक यॉर्कर कसा पडतो? 'मॅन ऑफ द मॅच'ची ट्रॉफी घेताना बुमराहाने सांगितलं सीक्रेट
IND vs ENG, 2nd Test Day 4 : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला चारली धूळ; कसोटी मालिकेत १-१अशी बरोबरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com