माऊंट मौनगानुई येथे दक्षिण आफ्रिका आणि न्युझीलंडच्या संघात कसोटी सामना खेळला जात आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी न्युझीलंडच्या फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव ठेवला. या कसोटी सामन्यात जगातील नंबर १ कसोटी फलंदाज केन विल्यमसनने शतक झळकावलं. विल्यमनसनने कसोटी करिअरमधील ३० वे शतक या सामन्यात पूर्ण केलं. केनच्या शानदानर खेळीमुळे न्युझीलंडच्या संघाने २४१ धावा केल्या आहेत. (Latest News)
आपल्या ३०व्या कसोटी शतकासह विल्यमसनने शतकांच्या यादीत ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन आणि महान फलंदाज विराट कोहलीला मागे टाकले आहे. विल्यमसनने आपल्या कौशल्यपूर्ण खेळ आणि हुशारी दाखवत हा पराक्रम गाजवला. त्शेपो मोरेकीचा सामना करताना केनने शॉर्ट चेंडू कुशलतेने मिड विकेटकडे खेळत शतक पूर्ण केले. केन विल्यमनसन हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज हे त्याच्या आजच्या सामन्यातील त्याची खेळी पाहून कळतं.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
न्यूझीलंडच्या खेळाडूने सर्वाधिक कसोटी शतके आणि द्विशतकांचा विक्रम विल्यमसनच्या नावावर आहे. त्याने डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ५ वे द्विशतक झळकावले. या पराक्रमामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये पाच द्विशतके झळकावणारा पहिला न्यूझीलंडचा फलंदाज बनलाय. तर कसोटी सामन्यात ३० पेक्षा जास्त शतके करणारा तो न्यूझीलंडचा एकमेव खेळाडू ठरलाय.
विल्यमसनने आतापर्यंत ९६ कसोटी सामने खेळले आहेत. यात २९ शतके झळकावली आहेत. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने ३० वे शतक पूर्ण केलं. त्याच्या ५५.२२ च्या सरासरीने २९ किंवा अधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या १८ फलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. केन फक्त जॅक कॅलिस, कुमार संगकारा यांसारख्या महान क्रिकेटपटूंच्या मागे आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.