Ind vs Eng: शुबमन-यशस्वीने केली २८ वर्षापूर्वी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती, काय आहे जुना पराक्रम?

India vs England 2nd Test : यशस्वी व शुबमन यांनी तिसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली आणि वयाच्या पंचवीशीच्या आत एकाच कसोटीत शतक झळकावणारी ही भारताची दुसरी जोडी ठरली. याआधी कोणत्या भारतीय फलंदाजांनी हा पराक्रम केलाय? हे जाणून घेऊ..
Shubman- Yashaswi
Shubman- YashaswiSaam Tv

Shubman- Yashaswi Repeats 28 years Ago History :

गेल्या दोन तीन डावांपासून खराब फॉर्ममध्ये असलेला शुबमन गिलने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावलं. सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने २०९ धावा करून भारताला सावरले होते आणि दुसऱ्या डावात गिलने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. तिसऱ्या दिवसाच्या आपल्या डावात भारताने २५५ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांची गरज आहे. या डावात गिलच्या शतकाने २८ वर्षांपूर्वीच्या एका पराक्रमाची पुनरावृत्ती घडली आहे. (Latest News)

सचिन तेंडुलकरशी बरोबरी

१४३ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २ धक्के बसले. जेम्स अँडरसनने कर्णधार रोहित शर्मा (१३) आणि यशस्वी जयस्वालला १७ धावात बाद केले. श्रेयस अय्यर ( २९) तर शुबमन गिलने ११२ चेंडूंत ८१ धावा जोडल्या. टॉम हार्टलीने अय्यरची विकेट घेतली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पण गिल खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याला अक्षर पटेलची साथ मिळाली. दोघांनी इंग्लंडच्या फिरकी माऱ्याचा सहजतेने सामना केला. या दोघांनी भारताच्या धावांची गती कायम राखत इंग्लंडवर दडपण तयार केलं. गिलने १३२ चेंडूंत ११ चौकार व २ चौकाराच्या मदतीने शतक झळकावले. आंतराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील गिलचं हे १० वे शतक होते. या शतकाच्या मदतीने गिलने भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर ( ३०) व विराट कोहली ( २१) यांच्याशी बरोबरी केली.

काय आहे पराक्रम

गिलने रवी शास्त्री व वीरेद्र सेहवाग ( ९) यांना मागे टाकले. २०१७नंतर भारतीय खेळपट्टीवर तिसऱ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. यशस्वी व शुबमन यांनी तिसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली आणि वयाच्या पंचवीशीच्या आत एकाच कसोटीत शतक झळकावणारी ही भारताची दुसरी जोडी ठरली. यशस्वी २२ वर्षांचा तर शुबमन २४ वर्षांचा आहे. यापूर्वी १९९६ मध्ये नॉटींगहॅम येथे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी इंग्लंडविरुद्ध असाच पराक्रम केला होता. तेव्हा हे दोघांचं वय २५ वर्षांखाली होतं.

Shubman- Yashaswi
IND vs ENG: बुमराहच्या यॉर्करने उडवली पोपची झोप; दुसऱ्या कसोटी सामन्यात बुडाल्या ऑलीच्या होप्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com