Virat Kohli Centuries: संघाबाहेर बसलेल्या विराट कोहलीला मोठा धक्का; कसोटी शतकांमध्ये 'या' खेळाडूने टाकलं मागे

Virat Kohli News: विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्याला आता मोठा धक्का बसला आहे.
Virat Kohli Records Century
Virat Kohli Records Century Saam TV

Virat Kohli Records Century

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्याला आता मोठा धक्का बसला आहे. कसोटीत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत न्यूझीलंडच्या एका खेळाडून विराटला मागे टाकलं आहे. विशेष बाब म्हणजे या खेळाडूने मागील 9 कसोटी डावांमध्ये 5 शतके झळकावली आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Virat Kohli Records Century
IND vs ENG: बुमराहच्या यॉर्करने उडवली पोपची झोप; दुसऱ्या कसोटी सामन्यात बुडाल्या ऑलीच्या होप्स

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आहे. एकीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात असताना, दुसरीकडे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातही दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला रविवारपासून सुरूवात झाली आहे. (Latest Marathi News)

मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने धमाकेदार सुरूवात केली असून कर्णधार केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांनी शतके झळकवली आहेत.

केन विल्यमसनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक ठोकले आहे. यासह विल्यमसन कसोटीत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या (Virat Kohli) पुढे गेला आहे. दुसरीकडे विराट हा कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या टॉप खेळाडूंच्या यादीत तळाशी आला आहे. विराटने आतापर्यंत कसोटीत 29 शतके झळकावली आहेत.

कसोटीत सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू

  • स्टीव्ह स्मिथ - ३२ शतके (१०७ सामने)

  • केन विल्यमसन - 30* शतके (97 सामने)

  • जो रूट - 30 शतके (137 सामने)

  • विराट कोहली - 29 शतके (113 सामने)

सर्वात जलद 30 कसोटी शतके झळकावणारा खेळाडू

  • 159 डाव - सचिन तेंडुलकर

  • 162 डाव - स्टीव्ह स्मिथ

  • 167 डाव - मॅथ्यू हेडन

  • 169 डाव - केन विल्यमसन

  • 170 डाव - रिकी पाँटिंग

  • 174 डाव - सुनील गावस्कर

रचिन रवींद्रचे पहिले कसोटी शतक

2023 च्या विश्वचषकात आपली छाप सोडणारा युवा खेळाडू रचिन रवींद्र सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले आहे. रचिन रवींद्रने 189 चेंडूंचा सामना करून 100 धावांचा टप्पा गाठला. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला.

Virat Kohli Records Century
Virar Kohali : विराट कोहली होणार पुन्हा बाबा; अनुष्का देणार गोड बातमी; AB डिव्हिलियर्सनं सांगितली खुशखबर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com