India vs England 2nd Test
India vs England 2nd TestSaam Tv

IND vs ENG, 2nd Test Day 4 : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला चारली धूळ; कसोटी मालिकेत १-१अशी बरोबरी

India vs England 2nd Test: पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला होता. दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी करत भारताने विजय मिळवला. या विजयासह कसोटी मालिकेत भारताने आणि इंग्लंडने १-१ अशी बरोबरी केलीय. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना हा १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Published on

India vs England 2nd Test Team India Won by 106 Runs :

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाला १०६ धावांनी पराभूत केलं आहे. भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाचा १०६ धावांनी पराभव झाला. इंग्लंड आणि भारताच्या संघात ५ कसोटी सामन्याच्या मालिकेत भारत आणि इंग्लंडच्या संघाने १-१ अशी बरोबरी केलीय.(Latest News)

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील (Test Match Series) पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये खेळला गेला हा सामना इंग्लंडने जिंकला होता. त्यानंतर विशाखापट्टणम येथे मालिकेतील दुसरा सामना झाला हा सामना खूप रोमांचकारी झाला. या रोमांचकारी सामन्यात भारताने शानदार विजय मिळवलाय. या कसोटी मालिकेचा तिसरा सामना १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय संघाचा (Team India) जलद गती गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah)भारताला अखेरची विकेट मिळवून दिली. बुमराहने या सामन्याच्या दोन्ही डावांसह एकूण ९ विकेट घेतल्य. बुमराहने सामन्याच्या दुसऱ्या डावातही ३ बळी घेतले होते. दुसरीकडे भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही सामन्याच्या दुसऱ्या डावात ३ बळी घेतले. भारतीय संघाच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना (Test Match) जिंकला.

दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव २५५ धावांवर आटोपला होता, यामुळे भारतीय संघ दुसरा कसोटी सामन्यात पराभूत होईल असं वाटत होतं. भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर ३९९ धावांचे आव्हान दिलं होतं. आज बुमराह आणि अश्विनच्या जबरदस्ती गोलंदाजीमुळे भारतीय संघाने विजय मिळवला. बुमराह आणि अश्विनसह मुकेश कुमार, फिरकी गोलंदाज अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी एक-एक विकेट घेतल्या.

India vs England 2nd Test
NZ vs SA: केन विल्यमसनने किंग कोहली मागे टाकलं; कसोटीत केला खास विक्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com