Jasprit Bumrah Instagram Story: बुमराहला नेमकं म्हणायचंय तरी काय? नंबर 1 गोलंदाज बनताच 'ती' पोस्ट चर्चेत!

Jasprit Bumrah News In Marathi:यावेळी तो आपल्या गोलंदाजीमुळे नव्हे तर आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आला आहे. त्याची स्टोरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
jasprit bumrah
jasprit bumrahyandex
Published On

Jasprit Bumrah Instagram Story:

भारत - इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला. पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ६ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात त्याने ३ फलंदाजांना माघारी धाडलं.

यासह त्याने दोन्ही डावात मिळून ९ गडी बाद केले. फिरकी गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. यापूर्वी हैदराबाद कसोटीतही त्याने शानदार गोलंदाजी करत ६ गडी बाद केले होते.

बुमराहची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल..

जसप्रीत बुमराह या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत या मालिकेतील २ सामन्यांमध्ये सर्वाधिक १५ गडी बाद केले आहेत. मात्र यावेळी तो आपल्या गोलंदाजीमुळे नव्हे तर आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आला आहे.

बुमराहने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात त्याने कौतुक करणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांची तुलना केल्याचं दिसून येत आहे. ही स्टोरी अपलोड होताच तुफान व्हायरल होऊ लागली आहे. दरम्यान क्रिकेट चाहते आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. (Cricket news in marathi)

jasprit bumrah
IND Vs ENG: विशाखापट्टणममधील पराभवानंतर स्टोक्सचं रडगाणं सुरू; DRSवर उपस्थित केला प्रश्न

आयसीसी रँकिंगमध्ये नंबर -१

बुधवारी (७ फेब्रुवारी) आयसीसीने कसोटी गोलंदाजांची रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी आहे. त्याने आर अश्विनला मागे सोडत अव्वल स्थान गाठलं आहे. आर अश्विनची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर जसप्रीत बुमराह हा आयसीसीच्या तिन्ही रँकिंगमध्ये नंबर १ स्थान गाठणारा जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

jasprit bumrah
IND vs ENG Test Series: सामना जिंकूनही टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; या कारणांमुळे मालिका जिंकणं कठीण

राजकोट कसोटीत बुमराह खेळणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली ५ कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने २८ धावांनी विजय मिळवला होता. तर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत कमबॅक करत इंग्लंडला १०६ धावांनी धूळ चारली. त्यामुळे तिसरा कसोटी सामना निर्णायक सामना असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com