Ben Stokes
Ben StokesSaam Tv

IND Vs ENG: विशाखापट्टणममधील पराभवानंतर स्टोक्सचं रडगाणं सुरू; DRSवर उपस्थित केला प्रश्न

Ben Stokes : दुसरा कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सने डीआरएसवर प्रश्न उपस्थित केलेत. सलामीवीर फलंदाज जॅक क्रॉली बाद नसतानाही त्याला बाद देण्यात आल्याचं स्टोक्स म्हणालाय.
Published on

विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंडच्या संघात दुसरा कसोटी सामना झाला. यात कसोटी सामन्यात भारताने १०६ धावांनी इंग्लंडचा धुव्वा उडवला. भारताने ज्याप्रमाणे पहिला पराभव स्वीकारला त्याप्रमाणे इंग्लंडचा संघ पराभव स्विकारताना दिसत नाहीये. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने थेट डीआरएसच्या तंत्रावर प्रश्न उपस्थित केले. स्टोक्सने डीआरएसचा निर्णय चुकीचा ठरवलाय. (Latest News)

कुलदीप यादवने जॅक क्रॉलीला एलबीडब्ल्यू म्हणजेच पायचीत करत बाद केलं. कुलदीपचा चेंडू जॅकच्या पायावरील पॅडवर आदळला त्यावेळी कुलदीपने जोरदार अपील केलं त्याची अपील नाकारत अंपायरने जॅकला नाबाद ठरवलं. त्यानतंर कुलदीपने रोहित शर्माला रिव्ह्यू घेण्याची मागणी केली. त्यानंतर डीआरएसने जॅकला बाद ठरवलं. रोहितने घेतलेल्या रिव्ह्यूमध्ये चेंडू थेट स्टंपवर लागत असल्याचं दिसलं आणि त्या जॅकला माघारी तंबूत जावं लागलं. दरम्यान सामना झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बेन स्टोक्सला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना स्टोक्स म्हणाला की, जॅकी क्रॉली बाद नव्हता परंतु त्या तंत्रज्ञानाच्या चुकीमुळे त्याला बाद ठरवण्यात आलं.

काय म्हणाला स्टोक्स

विशाखापट्टणम येथे झालेल्या कसोटीत सलामीवीर जॅक क्रॉली चांगली फलंदाजी करत होता. जॅकच्या खेळीमुळे इंग्लंड सामना जिंकेल, असं वाटत होतं. क्रॉलीने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. दरम्यान ४२ वं षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीसाठी आला. कुलदीपने जॅक क्रॉलीला पायचीत करत इंग्लंडच्या हातातून विजय हिसकावून घेतला.

दरम्यान जॅक क्रॉली पायचीत नसल्याचं अनेक खेळाडूंना वाटत होत. कुलदीपचा चेंडू लेग साईडचा स्टंपला स्पर्श करत होता असं अनेक खेळाडूंना आणि अंपायरला वाटत होतं. परंतु ज्यावेळी रिव्ह्यू घेण्यात आला तेव्हा जॅकला बाद ठरवण्यात आलं. यावर कर्णधार बेन स्टोक्सने नाराजी व्यक्त केली. जॅक हा बाद नव्हता परंतु तंत्रज्ञानाच्या चुकीमुळे त्याला त्याची विकेट गमावावी लागली, असं स्टोक्स म्हणाला.

Ben Stokes
Ben Stokes Catch: एकच नंबर! स्टोक्स २२ मीटर धावला अन् मागे डाईव्ह मारत घेतला भन्नाट झेल; अय्यर पाहतच राहिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com