IND vs ENG Test Series: सामना जिंकूनही टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; या कारणांमुळे मालिका जिंकणं कठीण

India vs England Test Series: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत दमदार कमबॅक करुन विजय मिळवला असला तरीदेखील काही गोष्टी आहेत जिथे भारतीय संघाला सुधारणा करण्याची गरज आहे.
team india
team indiasaam tv news
Published On

Indian Cricket Team:

भारतीय संघाने विशाखापट्टनम कसोटीत शानदार विजय मिळवला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत दमदार कमबॅक करुन विजय मिळवला असला तरीदेखील काही गोष्टी आहेत जिथे भारतीय संघाला सुधारणा करण्याची गरज आहे.

टॉप ऑर्डर..

भारतीय संघाने दोन्ही सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारली आहे. असं असेल तरी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारं कारण म्हणजे रोहित शर्माचा फॉर्म. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने दोन्ही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. तर शुभमन गिलने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली आहे. मात्र रोहित शर्माला अजुनही सुर गवसलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाला पुढील सामन्यांमध्ये विजय मिळवायचा असेल तर येणाऱ्या सामन्यांमध्ये रोहितने चांगली कामगिरी करणं गरजेचं असणार आहे. (Cricket news in marathi)

team india
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड मालिका रद्द होणार? इंग्लंडचा संघ परदेशात जाणार! वाचा कारण

मध्यक्रमातील फलंदाजांचा फ्लॉप शो..

भारतीय संघाचा मध्यक्रमही या दोन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप दिसून आला आहे. श्रेयस अय्यर हा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने फ्लॉप ठरतोय. गेल्या ४ डावात त्याला केवळ १०४ धावा करता आल्या आहेत. तर आपल्या पहिलाच सामना खेळता रजत पाटीदारही फ्लॉप ठरला आहे.

team india
IND vs ENG 2nd Test: भारत- इंग्लंड दुसऱ्या कसोटीतील जबरदस्त ५ कॅचेस! Video पाहून तुम्हीच ठरवा कोणती आवडली?

एकट्या बुमराहवर भार..

ज्या मैदानावर इंग्लंडने केवळ एका वेगवान गोलंदाजाला खेळवलं. त्याच खेळपट्टीवर भारतीय संघाने २ वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिलं. विशाखापट्टनममध्ये जसप्रीत बुमराह हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने दोन्ही डावात मिळून ९ गडी बाद केले. तर दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून मुकेश कुमारला संघात स्थान दिलं गेलं होतं. मुकेशला या संधीचा फायदा घेता आला नाही. एकिकडे बुमराह आक्रमण करुन फलंदाजांवर दबाव टाकत होता. तर दुसरीकडे मुकेश कुमार धावा खर्च करत होता.

यष्टीरक्षणात सुधार करण्याची गरज..

या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघातील खेळाडूंकडून हवं तसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं नाही. हैदराबाद कसोटीत ओली पोपला भारतीय क्षेत्ररक्षकांनी दोन जीवदान दिले. त्यानंतर पोपने मोठी खेळी केली. जर भारतीय संघाने त्या चुका केल्या नसत्या तर सामन्याचा निकाल वेगळा लागु शकला असता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com