Rohit Sharma Catch : रोहित शर्मानं ०.४५ सेकंद रिॲक्शन टाईममध्ये घेतला भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच

Rohit Sharma Catch Video: पहिल्या सामन्यातील शतकवीर ऑली पोप दुसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात स्वस्तात माघारी परतला आहे. त्याला बाद करण्यासाठी रोहित शर्माने भन्नाट झेल टिपला आहे.
Rohit Sharma
Rohit Sharmatwitter
Published On

IND vs ENG 2nd Test, Rohit Sharma Catch To Dismiss Ollie Pope:

वायझॅगच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडनेही दमदार सुरुवात केली आहे. दरम्यान पहिल्या सामन्यातील शतकवीर ऑली पोप दुसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात स्वस्तात माघारी परतला आहे. त्याला बाद करण्यासाठी रोहित शर्माने भन्नाट झेल टिपला आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा स्लिपमध्ये सर्वात क्षेत्ररक्षण करताना सर्वात विश्वासू क्षेत्ररक्षक मानला जातो. त्याला सर्वात विश्वासू क्षेत्ररक्षक का म्हणतात हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे.त्याने २३ धावांवर फलंदाजी करत असलेल्या ओली पोपचा भन्नाट झेला टिपला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Rohit Sharma catch video)

Rohit Sharma
Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वाल खरंच पाणीपुरी विकायचा का?काय आहे सत्य? जाणून घ्या

रोहितने टिपला भन्नाट झेल..

तर झाले असे की, इंग्लंडचा संघ धावांचा पाठलाग करत असताना झॅक क्रॉली आणि ओली पोपची जोडी चांगलीच जमली होती. त्यावेळी भारतीय संघाकडून २९ वे षटक टाकण्यासाठी आर अश्विन गोलंदाजीला आला. राऊंड द विकेटचा मारा करत असताना त्याने षटकातील दुसरा चेंडू ऑफ स्टम्पच्या लाईनमध्ये टाकला. (Cricket news in marathi)

Rohit Sharma
Ben Stokes Catch: एकच नंबर! स्टोक्स २२ मीटर धावला अन् मागे डाईव्ह मारत घेतला भन्नाट झेल; अय्यर पाहतच राहिला

मात्र टप्पा पडताच चेंडू थोडा वळला. या चेंडूवर पोपने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला. कारण चेंडू बॅटचा कडा घेत स्लिपमध्ये असलेल्या रोहित शर्माच्या हाती गेला. रोहितने डोळ्याची पापणीही न हलवता हा झेल टिपला. त्यानंतर सर्वच खेळाडू जल्लोष करु लागले. ओली पोपला स्वस्तात बाद करणं हे भारतीय संघासाठी सर्वात मोठं यश आहे. कारण हैदराबाद कसोटीत त्याने १९६ धावांची खेळी करत इंग्लंडच्य विजयात मोलाचं योगदान दिलं होतं.

इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचं आव्हान..

भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ३९९ धावांचं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला चांगली सुरुवात मिळाली होती. ५० धावांवर इंग्लंडला पहिला धक्का बसला. बेन डकेट २८ धावा करत माघारी परतला. इंग्लंडकडून धावांचा पाठलाग करताना झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com