Rohit Sharma Statement: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर रोहित या खेळाडूंवर भडकला! सांगितलं पराभवाचं नेमकं कारण
Rohit Sharma Statement On Team India Defeat:
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी अवघ्या २३१ धावांची गरज होती. मात्र हे आव्हान भारतीय संघाला पूर्ण करता आलं नाही. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २०२ धावांवर संपुष्टात आला. यासह भारतीय संघाने हा सामना २८ धावांनी गमावला. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा?
हा सामना झाल्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की,' नेमकं चुकलं कुठे हे सांगणं जरा कठीण आहे. कारण आम्ही १९० धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर इंग्लंडकडून ओली पोपने अप्रतिम फलंदाजी केली. एका परदेशी फलंदाजाने भारतात येऊन साकारलेली ही सर्वोत्तम खेळी होती.'
तसेच तो पुढे म्हणाला की,' मला वाटलं होतं की, २३० धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. मात्र हे शक्य होऊ शकलं नाही. मला वाटतं की,आम्ही अचुक लाईन-लेंथवर गोलंदाजी केली. मात्र ओली पोपने शानदार फलंदाजी केली. ' (Latest sports updates)
फलंदाजीत चूक झाली...
रोहित पुढे म्हणाला की,'एक-दोन गोष्टींचा विचार करणं कठीण आहे. आम्ही धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी करु शकलेलो नाही. खालच्या फळीतील फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की, इथे कशी फलंदाजी करायची होती. आम्हाला संधी मिळाली,मात्र आम्ही संधीची फायदा घेऊ शकलो नाही. हे होऊच शकतं. हा मालिकेतील पहिलाच सामना होता.
काय म्हणाला इंग्लंडचा कर्णधार?
बेन स्टोक्स म्हणाला की,' जेव्हापासून मी संघाची जबाबदारी सांभाळली आहे तेव्हापासून अनेक असे आनंदाचे क्षण आले आहेत. आम्ही अनेक सामने जिंकले आहेत. तर काही सामने अटीतटीचे झाले आहेत. मात्र आम्ही जिथे आहोत, ज्यांच्याविरुद्ध खेळतोय. हा विजय आमच्यासाठी १०० टक्के मोठा विजय आहे. कर्णधार म्हणून मी पहिल्यांदाच भारतात आलो आहे.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.