WTC Points Table: दारुण पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठी उलथापालथ

World Test Championship Points Table: इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
team india
team indiasaam tv news
Published On

World Test Championship Latest Updates:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयासह इंग्लंडने कसोटी मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान पराभवानंतर भारतीय संघाला दुहेरी धक्का बसला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठं नुकसान..

मायदेशात खेळताना भारतीय संघाला इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

या पराभवापूर्वी भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी विराजमान होता. भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने २ सामने जिंकले आहेत. २ सामने गमावले आहेत. तर १ सामना ड्रॉ राहिला आहे. यासह भारतीय संघाची विजयाची सरासरी घसरून ४३.३३ वर येऊन पोहोचली आहे. यापूर्वी ही सरासरी ५० ची होती. (Latest sports updates)

team india
IND vs ENG 1st Test Day 4: इंग्लंडचं बॅझबॉल पडलं टीम इंडियावर भारी, रोहितच्या सेनेने मालिकेचा पहिला कसोटी सामना गमावला

भारतीय संघाला बांगलादेशने सोडलं मागे..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बांगलादेशने भारतीय संघाला मागे सोडलं आहे. २ कसोटी सामन्यांपैकी १ सामना जिंकणारा आणि १ सामना गमावणारा बांगलादेशचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे.

तर न्यूझीलंडचा तिसऱ्या स्थानी, दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आणि ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ५५ ची आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या विजयाची सरासरी ही ५०-५० टक्के इतकी आहे.

team india
IND vs ENG Test: ऑली पोपने उडवली टीम इंडियाची झोप; हैदराबाद कसोटीवर इंग्लंडची मजबूत पकड

भारतीय संघाचा पराभव..

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावांची गरज होती. इंग्लंडकडून फिरकी गोलंदाज टॉम हार्टले चमकला. त्याने ७ गडी बाद करत भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमाचं कंबरडं मोडलं आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com