virat kohli
virat kohlisaam tv news

Team India Playing XI: विराटच्या अनुपस्थितीत कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११? चौथ्या क्रमांकावर या फलंदाजाला मिळू शकते संधी

India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
Published on

IND vs ENG, 1st Test Team India Playing XI:

भारत - इंग्लंड कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून हैदराबादच्या मैदानावर रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

आता पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान विराटच्या अनुपस्थितीत कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

सुरुवातीच्या २ सामन्यांमधून विराट बाहेर..

सोमवारी ( २२ जानेवारी) बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर पडला आहे. त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. मात्र त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. विराट कोहली बाहेर झाल्यानंतर त्याच्या जागी केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते.

विराट कोहलीची जागा घेण्यासाठी केएल राहुल हा परफेक्ट ऑप्शन आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत मध्यक्रमात फलंदाजी करत असताना दमदार शतकी खेळी केली होती. टर्निंग ट्रॅकमुळे केएल राहुलला केवळ फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं जाईल. तर केएस भरतला यष्टिरक्षक म्हणून संधी दिली जाऊ शकते. (Latest cricket news in marathi)

virat kohli
IND vs ENG: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! इंग्लंडविरुद्ध पहिल्या २ कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर

तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. श्रेयस अय्यरने गेल्या २ वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार खेळ केला आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर तर गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसून येऊ शकतो. तर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते.

virat kohli
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर?

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, केएस भरत (यष्टिरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com