भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामन्याला २५ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
या २ सामन्यांसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान तो पुढील ३ कसोटी सामन्यांमध्ये खेळणार की नाही? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसा मोहम्मद शमी लवकरच लंडनला रवाना होऊ शकतो. लंडनला जाऊन तो तज्ज्ञांचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे. असं म्हटलं जात आहे की, नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचे स्पोर्ट्स सायन्स डिपार्टमेन्टचे प्रमुख नितिन पटेल देखील शमीसह लंडनला जाऊ शकतात. सध्या शमी रिकव्हरी प्रोसेसमध्ये असून त्याला मैदानावरल कमबॅक करण्यासाठी कमीत कमी एक महिन्यांचा वेळ लागु शकतो.
वर्ल्डकपनंतर मैदानापासून दुर..
मोहम्मद शमीने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. ही स्पर्धा झाल्यानंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. या दुखापतीवर मात करण्यासाठी त्याचा नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत सराव सुरु आहे. त्याच्या दुखापतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. मात्र तो अजुनही पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करु शकत नाहीये. हेच कारण आहे की, तो तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला जात आहे. (Cricket News In Marathi)
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक),आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आवेश खान.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.