Rohit Sharma: 'हे चुकलंच..' रोहित दुसऱ्यांदा फलंदाजीला येण्यावर अफगाणिस्तानच्या खेळाडूची लक्षवेधी प्रतिक्रिया

Rohit Sharma News In Marathi: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात रोहित शर्मा सुपर ओव्हरमध्ये दोन वेळेस फलंदाजी करण्यासाठी आला होता.
rohit sharma
rohit sharmasaam tv news
Published On

Karim Janat On Rohit Sharma: 

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बंगळुरूत पार पडला. या सामन्यात दोन वेळा सुपर ओव्हर झाल्यानंतर विजयी संघाचा निकाल लागला. यादरम्यान रोहित शर्मा दोन्ही सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करायला आला.

यावरून नवा वाद पेटला आहे. यावरून अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच अफगाणिस्तानच्या खेळाडूनेही रोहितच्या दुसऱ्यांदा फलंदाजीला येण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अफगाणिस्तानचा खेळाडू करीम जन्नत याचं म्हणणं आहे की, रोहितने दुसऱ्यांदा फलंदाजीला यायचं नव्हतं. तो म्हणाला की, ' आम्हाला याबाबत अधिक माहिती नव्हती. आमच्या मॅनेजमेंटने अंपायर्ससोबत चर्चा केली.

रोहित फलंदाजीला आला होता. मात्र आम्हाला नंतर माहीत झालं की, त्याला असं करायची अनुमती नव्हती. जरी तो रिटायर्ड आऊट झाला असला तरीदेखील तो असं करू शकत नव्हता. आता आम्ही फारसं काही करू शकत नाही. कारण जे झालं ते झालं. कर्णधार आणि प्रशिक्षकांनी याबाबत चर्चा केली होती.' (Latest sports updates)

rohit sharma
IND vs ENG: टीम इंडियाचा हा स्टार फलंदाज ठरणार गेम चेंजर! रेकॉर्ड पाहून इंग्लंडच्या गोलंदाजांचा थरकापच उडेल

अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक काय म्हणाले?

तसेच अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जॉनाथन ट्रॉट म्हणाला की, ' याआधी कधी २ सुपर ओव्हर झाले आहेत का? मला हेच म्हणायचं आहे की, आपण नवे नियम बनवत असतो. आम्ही नियमांचं पालन करत राहिलो.'

rohit sharma
KS Bharat Century: केएस भरतचं शतक प्रभू श्री रामांना समर्पित! प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी केलं हटके सेलिब्रेशन; Video

दोन सुपर ओव्हरनंतर लागला निकाल..

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २१२ धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानलाही २१२ धावा करत आल्या. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर झाली. पहिल्या सुपरओव्हरमध्ये अफगाणिस्तानने १६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघालाही १६ धावा करता आल्या.

त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ११ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचे दोन्ही फलंदाज बाद झाले. त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यात सोपा विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com