India vs Afghanistan: 'सिक्सर किंग' रोहित शर्माचं तुफानी शतक; टीम इंडियाचं अफगाणिस्तानसमोर 213 धावांचं आव्हान

India vs Afghanistan t20 match: अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित शर्माने तुफानी शतक ठोकलं. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने अफगाणिस्तानला 213 धावांचं आव्हान दिलं आहे.
India vs Afghanistan
India vs AfghanistanSaam tv
Published On

India vs Afghanistan:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेतील तिसरा टी-२० सामना बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित शर्माने तुफानी शतक ठोकलं. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने अफगाणिस्तानला 213 धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

रोहित शर्माचं वादळी शतक

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात चार गडी गमावून २१२ धावा ठोकल्या. या सामन्यात रोहित शर्माने वादळी शतक ठोकलं. रोहितने ६९ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद १२१ धावा केल्या. तर रिंकूने ३९ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. रोहित आणि रिंकूने पाचव्या विकेटसाठी १९० धावांची नाबाद भागीदारी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

India vs Afghanistan
Rohit Sharma Batting: हिटमॅन रोहित शर्माने रचला इतिहास, असा कारनामा करणारा जगातील पहिलाच खेळाडू

भारताची खराब सुरुवात

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. विराट कोहली आणि संजू सॅमसनने शून्य धावांवर बाद झाले. यशस्वी जैयस्वालने ४ धावा केल्या. तर शिवम दुबेने १ धाव काढली. मात्र त्यानंतर रोहित आणि रिंकूने संघाचा डाव सावरला.

India vs Afghanistan
AUS vs WI: पदार्पणाच्या सामन्यातच वेस्टइंडिजच्या गोलंदाजाची कमाल! ८५ वर्षांत पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड

रोहित शर्माने रचला इतिहास

रोहित शर्माने पाचवे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शतक ठोकलं. रोहितशिवाय आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत कोणालाही पाच शतक करणे जमलं नाही. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवे शतक ठोकत इतिहास रचला आहे. रोहितने तुफानी फटकेबाजी करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com