भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने T20आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचलाय. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावलं. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रोहितने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची खरडपट्टी काढली. (Latest News)
चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये (Chinnaswamy Stadium) झालेल्या सामन्यात रोहितने तडाखेबाज फलंदाजी केली. रोहितने चौकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं, या शतकासह रोहितने विराट कोहलीला मागे सोडले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Cricket) कर्णधार (Captain) म्हणून सर्वाधिक धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनलाय. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या T20 मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात रोहित शून्यावर बाद झाला होता. पण तिसर्या टी-२० मध्ये त्याने शतक झळकावून जबरदस्त पुनरागमन केलं.
'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारताची खराब सुरुवात
भारताने (India) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. विराट कोहली आणि संजू सॅमसनने (Sanju Samson) शून्य धावांवर बाद झाले. यशस्वी जयस्वालने (Yashswi Jaiswal) ४ धावा केल्या. तर शिवम दुबेने १ धाव काढली. मात्र त्यानंतर रोहित आणि रिंकूने संघाचा डाव सावरला. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवे शतक (Century) ठोकत इतिहास रचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.