Rohit Sharma Record: रोहितचा भीमपराक्रम! मोठ्या रेकॉर्डमध्ये सौरव गांगुलीलाही सोडलं मागे

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्माच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
rohit sharma
rohit sharmasaam tv news
Published On

Rohit Sharma Record In Test:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये सुरू आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर असल्याचं दिसून आलं आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने २४ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

रोहित शर्मा भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला मागे सोडलं आहे.

पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्मा यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला होता. त्याने या डावात २७ चेंडूत ३ चौकारांच्या साहाय्याने २४ धावा चोपल्या. यासह त्याने सौरव गांगुलीला मागे सोडलं आहे. सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८४३३ धावा केल्या होत्या. तर रोहित शर्माने आतापर्यंत १८४४४ धावा केल्या आहेत. रोहितने हा कारनामा ४९० डावात करून दाखवला आहे. तर सौरव गांगुलीने हा कारनामा ४८५ डावात केला होता.

rohit sharma
IND vs ENG: जडेजा बनला टीम इंडियाचा संकटमोचक! अर्धशतक झळकावताच केलं हटके सेलिब्रेशन - VIDEO

अव्वल स्थानी कोण?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने ६६४ सामन्यातील ७८२ डावात ३४३५७ धावा केल्या आहेत. तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. विराटच्या नावे २६७३७ धावा करण्याची नोंद आहे. भारताचा माजी खेळाडू आणि वर्तमान भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. राहुल द्रविडने २४०६४ धावा केल्या आहेत. (Cricket News In Marathi)

rohit sharma
IND vs ENG Test Series: 'इंग्लंड ही मालिका ५-० ने गमवणार..' दिग्गजाने भविष्यवाणी करत कारणही सांगितलं

रोहितच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ५५ कसोटी सामन्यांमध्ये ३७६२ धावा केल्या आहेत. तर २६२ वनडे सामन्यांमध्ये त्याने १०७०९ आणि १५१ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ३९७४ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com