विशाखापट्टनमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. मात्र याच खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मागे सोडत संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पंचक घेतलं आहे. त्याने एका पाठोपाठ एक इंग्लंडच्या ५ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. यादरम्यान त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
असा कारनामा करणारा दुसराच गोलंदाज..
या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजांना प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. भारतीय संघाने ३९६ धावांचा डोंगर उभारल्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजी करण्यासाठी आला होता.
इंग्लंडने बॅझबॉल खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र भरतीय गोलंदाजांनी बॅझबॉलवर ब्रेक लावला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स आणि टॉम हार्टलेला बाद करत माघारी धाडलं. यासह त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. (Cricket news in marathi)
बेन स्टोक्सची दांडी गुल करताच त्याने कसोटी कारकिर्दीत १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तो कसोटीत सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने ३४ व्या कसोटी सामन्यात हा कारनामा करुन दाखवला आहे.
यापूर्वी हा कारनामा कुठलाच गोलंदाजाला करता आला नव्हता. यासह त्याच्या नावे आणखी एक मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा आशियातील दुसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी वकार युनुसने २७ कसोटी सामन्यांमध्ये १५० विकेट्स घेतल्या होत्या. तर इमरान खानने ३७ आणि शोएब अख्तरने ३७ कसोटी सामन्यांमध्ये हा कारनामा करुन दाखवला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेणारे आशियातील वेगवान गोलंदाज
वकार युनुस- २७ सामने
जसप्रीत बुमराह - ३४ सामने
इमरान खान - ३७ सामने
शोएब अख्तर -३७ सामने
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.