Mohammed Siraj Record: मोहम्मद सिराज चमकला! मोठ्या रेकॉर्डमध्ये इशांत शर्मा अन् जवागल श्रीनाथला सोडलं मागे

India vs South Africa 2nd Test: केपटाऊन कसोटीत मोहम्मद सिराज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर चांगलाच गरजला. त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ९ षटकात १५ धावा खर्च करत ६ फलंदाजांना माघारी धाडलं.
mohammed siraj
mohammed sirajgoogle
Published On

Mohammed Siraj Breaks Big Record In Test:

केपटाऊन कसोटीत मोहम्मद सिराज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर चांगलाच गरजला. त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ९ षटकात १५ धावा खर्च करत ६ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याने सामन्यातील पहिल्याच सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या नांग्या ठेचत ५ गडी बाद केले. या दमदार कामगिरीसह त्याच्या नावे अनेक मोठ्या रेकॉर्डसची नोंद झाली आहे.

भारतीय संघाकडून कसोटीत गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वात कमी धावा खर्च करत ५ गडी बाद केले होते. त्याने वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्यात ७ धावा खर्च करत ५ फलंदाजांना बाद केलं होतं.

या मोठ्या रेकॉर्डची नोंद..

या यादीत मोहम्मद सिराज दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. मोहम्मद सिराजने १५ धावा खर्च करत ६ गडी बाद केले आहेत. या यादीत जवागल श्रीनाथसारख्या दिग्गज गोलंदाजांचा देखील समावेश आहे. श्रीनाथ यांनी १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात २१ धावा खर्च करत ६ गडी बाद केले होते.

mohammed siraj
IND vs SA, Day 1: केपटाऊन कसोटीतील पहिलाच दिवस ठरला रेकॉर्ड ब्रेकिंग! १५० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड

या दिग्गज गोलंदाजांचाही समावेश..

या यादीत वेगवान गोलंदाज इशांत शर्माचाही समावेश आहे. इशांत शर्माने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात २२ धावा खर्च करत ५ गडी बाद केले होते. यासह मदन लाल यांनी १९८१ मध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात २३ धावा खर्च करत ५ गडी बाद केले होते.

मोहम्मद सिराजच्या या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज टिकुच शकले नाही. घरच्याच मैदानावर खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर संपुष्टात आला. (Latest sports updates)

mohammed siraj
IND vs SA 2nd Test : पहिल्याच दिवशी पडल्या २३ विकेट; १३४ वर्षांपूर्वी घडला होता पहिला विक्रम

भारतीय संघ आघाडीवर..

भारतीय संघाला या सामन्यात मोठी आघाडी घेण्याची सुवर्णसंधी होती. मात्र भारतीय संघाचा डाव अवघ्या १५३ धावांवर आटोपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्याच दिवशी दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत ६३ धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघाने ३६ धावांची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com