भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिला दिवस रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हता. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर संपुष्टात आला. दरम्यान सामन्याच्या पहिल्याच दिवशी काही मोठे रेकॉर्डस बनवले गेले आहेत.
शून्य धावा अन् ६ विकेट्स..
भारतीय संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला त्यावेळी १५३ धावांवर भारतीय संघाचे ४ फलंदाज माघारी परतले होते. त्यांनंतर १५३ वर भारतीय संघाला पाचवा धक्का बसला. इथून पुढे सलग ५ फलंदाज बाद होऊन माघारी परतले.
अशाप्रकारे शून्यावर भारतीय संघाचे ६ फलंदाज बाद झाले. या डावात ७ भारतीय फलंदाज खातं ही न उघडता माघारी परतले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच असं घडलं आहे जेव्हा एकाच डावातील ७ फलंदाज शून्यावर बाद होऊन परतले.
केपटाऊन कसोटीच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ २ वेळा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. यादिवशी २३ विकेट्स घेतल्या गेल्या, जो एक रेकॉर्ड आहे. यापूर्वी एकाच दिवशी सर्वात जास्त विकेट्स पडण्याचा रेकॉर्ड १२१ वर्षांपूर्वी बनवला गेला होता. (Latest sports updates)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात रेकॉर्ड २५ फलंदाज बाद होऊन माघारी परतले होते. हा कसोटी सामना १९०२ मध्ये खेळला गेला होता. दरम्यान १४७ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदाच असं काही घडलं आहे. त्यामुळे या कसोटी सामन्याची इतिहासात नोंद झाली आहे.
भारतीय संघाकडे ३६ धावांची आघाडी
भारतीय संघाचा डाव १५३ धावांवर आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसअखेर ३ गडी बाद ६३ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ ३६ धावांनी पिछाडीवर आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.