भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे. या मैदानावरील भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला,तर भारतीय संघ या मैदानावर आजवर जिंकू शकलेला नाही.
त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका वाचवण्याची आणि इतिहास रचण्याची संधी असणार आहे. भारतीय संघात २ असे खेळाडू आहेत, ते आजवरचा इतिहास बदलून भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देऊ शकतात.
जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड..
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात याच मैदानावरुन केली होती. त्याने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरद्ध पदार्पण केलं होतं. आपल्याच पहिल्याच सामन्यात त्याने ४ गडी बाद केले होते. त्याचा या मैदानावरील रेकॉर्ड जबरदस्त राहिलाय. २ कसोटी सामन्यांमध्ये त्याने १० गडी बाद केले आहेत.
विराट कोहली..
विराट कोहली हा भारतीय संघातील स्टार फलंदाज आहे. त्याने केवळ दक्षिण आफ्रिकेत नव्हे तर जगभरातील मैदांनावर जाऊन धावांचा पाऊस पाडला आहे. विराटच्या केप टाऊन मैदानावरील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर त्याने २ सामन्यांमध्ये १४१ धावा केल्या आहेत. त्यामुळे या सामन्यातही विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. (Latest sports updates)
रोहित शर्मा..
गेल्या ३१ वर्षांपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत जाऊन पराभूत करु शकलेला नाही. २०१० मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मालिका १-१ ने ड्रॉ केली होती. यावेळी रोहित शर्माला धोनीच्या या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे. जर भारतीय संघ दुसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला,तर दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका ड्रॉ करणारा रोहित दुसराच कर्णधार ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.