IND vs SA 2nd Test : पहिल्याच दिवशी पडल्या २३ विकेट; १३४ वर्षांपूर्वी घडला होता पहिला विक्रम

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट्स पडल्या असून दोन्ही संघांचा पहिला डाव गडगडला. पण या सर्व खेळात एक असा विक्रम झाला जो तब्बल १३४ वर्षांनंतर घडला
IND vs SA 2nd Test
IND vs SA 2nd TestCribuzz
Published On

IND vs SA 2nd Test Wicket Record:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना जोरदार झुंज दिलीय. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दोन्ही संघांचा पहिला डाव गडगडला. कसोटीच्या पहिल्या दिवशीच २३ विकेट पडल्याने एक अनोखा विक्रम झालाय. बुमराहाने आफ्रिकेला तिसरा धक्का दिल्यानंतर कसोटी क्रिकेटमधील १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम तुटला. (Latest News)

दरम्यान आज खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस हा दोन्ही संघासाठी वाईट ठरला. दोन्ही संघाच्या फलंदाजांची घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. मोहम्मद सिराजने ६ विकेट घेतल्या.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) फलंदाजांचा टिकाव लागला नाही आणि आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. भारतीय संघाचीही ( Indian team) अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली.

IND vs SA 2nd Test
David Warner: अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी वॉर्नरला धक्का; मुलींच्या भेटवस्तू असलेली बॅकपॅक चोरट्यांनी पळवली

रोहित शर्मा ( ३९), शुबमन गिल ( ३६) आणि विराट कोहली ( ४६) यांच्या खेळीनंतरही भारताला पहिल्या डावात १५३ धावा करता आल्या. भारताने १५३ धावांवर ४ विकेट गमावले होते. परंतु या धावसंख्येनंतर टीम इंडियाच्या (Team India) एकाही फलंदाजाला एकही धाव न करता आली नाही. नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

दरम्यान भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी घेता आली. त्यानंतर दुसऱ्या डावासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ परत मैदानात उतरला. यावेळी कर्णधार डीन एल्गर मोजक्या काही धावा करून बाद झाला. मुकेश कुमारने एल्गरला बाद केले. मुकेशने त्याच्या पुढच्या षटकात आफ्रिकेच्या टॉनी जॉर्जीला बाद करून दुसरा धक्का दिला. जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम चेंडूवर त्रिस्तान स्टब्स ( १) माघारी परतला. ४५ धावांवर आफ्रिकेने तीन गडी गमावले.

IND vs SA 2nd Test
IND vs SA: केपटाऊन विजयासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी; मालिका वाचवण्यासाठी कंबर कसली

पण या सर्व खेळात एक असा विक्रम झाला जो तब्बल १३४ वर्षांनंतर घडला. दक्षिण आफ्रिकेतील कसोटीच्या एका दिवसात २३ विकेट्स पडण्याची ही दुसरी वेळ ठरली. १८९६मध्ये आफ्रिका वि. इंग्लंड यांच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २१ विकेट्स पडलेल्या आणि आज हा विक्रम तुटला गेला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक विकेट्स पडल्याची ही दुसरी वेळ ठरली.

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक २५ विकेट्स पडल्याचा विक्रम १९०२ मध्ये घडलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या १५ ( १०-११२ व ५-४८) आणि इंग्लंडच्या ( १०-६१) अशा मिळून २५ विकेट पडल्या होत्या. १८९० मध्ये इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या दिवशी २२ विकेट्स पडलेल्या.तर २०११ मध्ये आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी २३ विकेट्स पडल्या होत्या.

IND vs SA 2nd Test
Mohammed Siraj: मोहम्मद सिराजने रचला इतिहास! पहिल्याच सेशनमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com