IND vs ENG Test Series: शेवटच्या ३ सामन्यांसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा! हे २ स्टार खेळाडू करू शकतात कमबॅक

Team India Squad Announcement: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.
team india
team indiasaam tv news
Published On

Team India Squad For IND vs ENG 3rd Test:

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. हा सामना येत्या १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमधून बाहेर असलेला विराट कोहली तिसऱ्या सामन्यातूनही बाहेर होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरुवातीच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली होती. या संघात विराट कोहलीला स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती.

तो तिसरा कसोटी सामना खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीला स्थान दिलं जाणार नाही. तो जेव्हा खेळण्यासाठी तयार असेल तेव्हा त्याचा संघात समावेश केला जाईल. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे.

team india
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड मालिका रद्द होणार? इंग्लंडचा संघ परदेशात जाणार! वाचा कारण

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडीयन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीत म्हटले की, ' विराटला केव्हा परतायचं आहे हे तो स्वतः ठरवेल. त्याने आम्हाला याबाबत काहीच कल्पना दिलेली नाही. मात्र त्याला जेव्हा कमबॅक करायचं असेल त्यावेळी त्याला संघात स्थान दिलं जाईल. ' (Cricket news in marathi)

team india
IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या कसोटीत बुमराह खेळणार! KL Rahul अन् Ravindra Jadeja बाबतही समोर आली मोठी अपडेट

विराट कोहली हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहे .कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच त्याने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने प्रेस रिलीज प्रसिद्ध करत ही माहिती दिली होती. त्यात असं म्हटलं गेलं होतं की, विराटला वैयक्तिक कारणास्तव विश्रांती हवी आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्या विनंतीला मान देत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे २ खेळाडू परतणार..

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्टार खेळाडूंचं पुनरागमन होऊ शकतं. हैदराबाद कसोटीनंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा हे दोघेही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले होते. मात्र तिसऱ्या कसोटीत हे दोघेही कमबॅक करू शकतात. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com