भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या एसीए व्हीडीसीए स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात यजमान भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आहे. गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघात बदल..
या सामन्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले आहेत.
दरम्यान हे दोन्ही खेळाडू बाहेर झाल्यानंतर सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमारला संघात स्थान दिलं गेलं. या कसोटी सामन्यासाठी रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.
तो केएल राहुलच्या जागी खेळताना दिसेल. तर रविंद्र जडेजाच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान दिलं गेलं आहे. गेल्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या मोहम्मद सिराजला या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. त्याच्याऐवजी मुकेश कुमारला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे.
तर इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये संघातील प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसनचं कमबॅक झालं आहे. तर फिरकी गोलंदाज शोएब बशीरला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. (Cricket news in marathi)
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारतीय संघ: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस, भरत (यष्टीरक्षक),आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार
इंग्लंड: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.