IND vs ENG 2nd Test Match Details: केव्हा, कधी आणि कुठे पाहता येईल भारत - इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना

When And Where To Watch IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. दरम्यान हा सामना केव्हा,कुठे आणि कधी पाहता येईल? जाणून घ्या.
ind vs eng 2nd test
ind vs eng 2nd testsaam tv news
Published On

IND vs ENG 2nd Test Match Details:

हैदराबाद कसोटीत भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय १-० ने पिछाडीवर आहे. मालिकेतील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ पराभवाचा बदला घेण्यासह मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर इंग्लंडचा संघ २-० ने आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

केव्हा, कुठे आणि कधी पाहता येईल भारत - इंग्लंड दुसरा कसोटी सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. हा सामना जर तुम्ही टीव्हीवर पाहत असाल तर स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहू शकता. तसेच मोबाईल किंवा लॅपटॉपवर पाहत असाल तर जिओ सिनेमावर लाईव्ह पाहता येईल.

या सामन्याचं समालोचन तुम्ही इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत ऐकू शकता. मुख्य बाब जिओ सिनेमावर हे सामने पाहण्यासाठी कुठलंही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही.

ind vs eng 2nd test
IND vs ENG 2nd Test: रजत पाटीदार की सरफराज खान? कोणाला मिळणार स्थान? बॅटिंग कोचने कोडं सोडवलं

प्रमुख खेळाडू बाहेर..

भारतीय संघाला या मालिकेत मोठे धक्के बसले आहेत. या सामन्यात विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि केएल राहुल खेळताना दिसून येणार नाही. विराटने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. तर जडेजा आणि राहुल दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. तर दुसरीकडे इंग्लंडलाही मोठा धक्का बसला आहे. जॅक लीच दुखापतग्रस्त असून तो दुसऱ्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. (Cricket news in marathi)

ind vs eng 2nd test
IND vs ENG 2nd Test: जडेजा अन् राहुलच्या जागी कोणाला संधी मिळणार? हे आहेत पर्याय

अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार/सरफराज खान, केएस भरत, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर

अशी असू शकते इंग्लंडची प्लेइंग ११:

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, शोएब बशीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com