पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले आहेत. भारतीय संघ या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असताना हे दोन्ही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त होणं हे कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) चिंता वाढवणारं आहे.
त्यामुळे या दोन्ही खेळाडूंची जागा कोण भरून काढणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान या दोन्ही खेळाडूंच्या जागी कोणाला संधी मिळू शकते, जाणून घ्या.
या खेळाडूंना मिळू शकते संधी..
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनममध्ये रंगणार आहे. केएल राहुल (KL Rahul) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) बाहेर झाल्यानंतर सरफराज खान (Sarfaraz Khan), सौरभ कुमार (Sourabh Kumar) आणि वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) संघात स्थान दिलं गेलं आहे.
तर विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदारला संधी दिली गेली आहे. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या रजत पाटीदारला मध्यक्रमात केएल राहुलच्या जागी संधी दिली जाऊ शकते. तर रविंद्र जडेजाच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. (Cricket news in marathi)
या सामन्यासाठी भारतीय संघात ४ फिरकी गोलंदाज आणि केवळ १ वेगवान गोलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. असे झाल्यास मोहम्मद सिराजला बाहेर बसावं लागेल. तर कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर खेळताना दिसतील. वॉशिंग्टन सुंदर आणि सरफराज खान मध्यक्रमात फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात.
या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (कर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वाशिंगटन सुंदर आणि सौरभ कुमार.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.