IND vs ENG: 'इंग्लंड ही मालिका ५-० ने जिंकणार..'दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

Monty Panesar Statement: यावेळी इंग्लंडचा संघ भारतीय संघाला ५-० ने धूळ चारु शकतो, असं वक्तव्य इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने केलं आहे.
england cricket team
england cricket teamyandex
Published On

Monty Panesar Prediction:

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने भारतीय संघाला पहिल्या कसोटीत धूळ चारली आहे. हैदराबाद कसोटीत इंग्लंडने २८ धावांनी विजय मिळवला. यासह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

गेल्या १२ वर्षांपासून भारतीय संघाने मायदेशात खेळताना एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. यावेळी इंग्लंडचा संघ भारतीय संघाला ५-० ने धूळ चारु शकतो, असं वक्तव्य इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने केलं आहे.

इंग्लंडचा माजी गोलंदाज माँटी पानेसरने (Monty Panesar) एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,' जर ओली पोप आणि टॉम हार्टले अशीच कामगिरी करत राहीले तर इंग्लंडचा संघ भारतीय संघाचा सुपडा साफ करु शकतो.

इंग्लंडचा संघ ही मालिका ५-० ने जिंकू शकतो.'हैदराबाद कसोटीत इंग्लंडचा संघ अडचणीत असताना ओली पोपने १९६ धावांची खेळी केली होती. तर भारतीय संघ ज्यावेळी धावांचा पाठलाग करत होता, त्यावेळी टॉम हार्टलेने ७ गडी बाद केले होते.

england cricket team
IND vs ENG 2nd Test: दुसऱ्या सामन्यापूर्वीच इंग्लंडच्या ताफ्यात भीतीचं वातावरण! या कारणामुळे बेन स्टोक्सचं टेन्शन वाढलं

तसेच पहिल्या कसोटी सामन्यातील विजयाबद्दल बोलताना तो म्हणाला की,' अर्थातच हा खूप मोठा विजय आहे. कोणी विचारच केला नसेल की असं काही होईल. भारतीय संघाने १९० धावांची आघाडी घेतल्यानंतर मला वाटलं होतं की, भारतीय संघ हा सामना गमावणार. मात्र त्यानंतर ओली पोपने महत्वपूर्ण खेळी केली. बऱ्याच वर्षांनी पोपसारखी खेळी पाहायला मिळाली आहे.' (Cricket news in marathi)

england cricket team
IND vs ENG 2nd Test: 'दुष्काळात तेरावा महिना..',दुसऱ्या कसोटी सामन्यापू्र्वी रोहित शर्माचं टेन्शन वाढलं

भारतीय संघाचा पराभव..

भारतीय संघाने या सामन्यावर पकड बनवली होती. पहिल्या डावात भारतीय संघाने १९० धावांची आघाडी घेतली होती. इथून भारतीय संघाचा विजय स्पष्ट दिसत होता. मात्र त्यानंतर पोपने १९६ धावांची तुफानी खेळी केली इंग्लंडची धावसंख्या ४०० पार पोहचवली.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला २०२ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाला हा सामना २८ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com