भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टनमध्ये रंगणार आहे.
पहिला सामना गमावलेला भारतीय संघ कुठल्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकण्याच्या प्रयत्नातन असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. दरम्यान विशाखापट्टनममध्ये खेळताना कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड? जाणून घ्या.
विशाखापट्ट्नममध्ये भारतीय संघाला २ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. मुख्य बाब म्हणजे हे दोन्ही कसोटी सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. भारताचा रेकॉर्ड चांगला असला तरीदेखील भारतीय संघाला इंग्लंडकडून सावध राहावं लागणार आहे. २०१६ मध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ कसोटी सामन्यासाठी आमने सामने आले होते.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या डावात ४५५ तर दुसऱ्या डावात २०४ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडला पहिल्या डावात २५५ आणि दुसऱ्या डावात १५८ धावा करता आल्या. भारतीय संघाने या सामन्यात २४६ धावांनी विजय मिळवला होता. (Latest sports updates)
दक्षिण आफ्रिकेवर मिळवला विजय..
याच मैदानावर २०१९ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. भारतीय संघाने या सामन्यात २०३ धावांनी विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा भारतीय संघ या मैदानावर खेळण्यासाठी उतरणार आहे.
या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बाब म्हणजे, संघातील प्रमुख खेळाडू रविंद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोघेही बाहेर झाले आहेत. त्यामुळे इंग्लंडला थोडा फार तरी दिलासा मिळाला असेल.
या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या सामन्यात दमदार खेळ केला होता. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघात सरफराज खान,वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांना संधी देण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.