भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणारा दुसरा कसोटी सामना येत्या २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टनममध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
मालिका सुरु होण्यापूर्वीच मोहम्मद शमी (Mohammed Shami) खेळणार नसल्याची माहिती समोर आली होती. तर विराटने मालिकेतून माघार घेतली होती. आता दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला केएल राहुल (KL Rahul) आणि रविंद्र जडेजाशिवाय (Ravindra Jadeja) मैदानात उतरावं लागणार आहे. त्यामुळे महत्वाच्या सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma) संघातील ४ प्रमुख खेळाडूंशिवाय मैदानात उतरावं लागणार आहे.
संघातील प्रमुख खेळाडू बाहेर..
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले आहेत. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा हे दोघेही दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. तर विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव सुरुवातीच्या २ सामन्यांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मालिकेत पिछाडीवर असलेल्या भारतीय संघात युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)
राहुलची कमतरता जाणवणार?
विराट कोहली दुसऱ्या सामन्यासाठीही उपलब्ध नसणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलने मध्यक्रमात मोलाची भूमिका बजावली होती. दक्षिण आफ्रिकेतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. त्यानंतर हैदराबाद कसोटीतील पहिल्या डावात त्याने ८७ धावांची खेळी केली.
तर दुसरीकडे रविंद्र जडेजाने देखील हैदराबाद कसोटीत दमदार कामगिरी केली होती. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं होतं. त्याने गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले होते. तर फलंदाजी करताना त्याने ८६ धावांची तुफानी खेळी केली होती. हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळणार नाहीत. त्यामुळे या दोघांची जागा कोण भरून काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.