Ravindra Jadeja: अंपायरच्या चुकीमुळे हुकलं जडेजाचं शतक? नेमकं काय घडलं? पाहा Video

Ravindra Jadeja Wicket Controversy: हैदराबाद कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघाचा संपूर्ण डाव ४३६ धावांवर संपुष्टात आला आहे. भारतीय संघाकडून तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना रविंद्र जडेजाने ८७ धावांची खेळी केली.
ravindra jadeja
ravindra jadejatwitter
Published On

Ravindra Jadeja Wicket Controversy:

हैदराबाद कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघाचा संपूर्ण डाव ४३६ धावांवर संपुष्टात आला आहे. भारतीय संघाकडून तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना रविंद्र जडेजाने ८७ धावांची खेळी केली.

त्याचं शतक अवघ्या १३ धावांनी हुकलं आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ज्याप्रकारे भारतीय फलंदाज फलंदाजी करत होते त्यावरुन असं वाटत होतं की, भारतीय संघ ५०० धावा करुन या डावात मोठी आघाडी घेणार. मात्र असं काहीच झालं नाही.रविंद्र जडेजा ८७ धावांवर माघारी परतला.

जडेजाबाबत निर्णय देताना अंपायरकडून चूक?

केएल राहुल बाद झाल्यानंतर जडेजाने अक्षर पटेलसोबत मिळून एक बाजू धरुन ठेवली होती. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर असं वाटत होतं की, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो शतक झळकावणार.

मात्र ८७ धावांवर जो रुटने त्याला बाद केलं. तर झाले असे की, रविंद्र जडेजा ८७ धावांवर फलंदाजी करत असताना जो रुट गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकात जो रुटचा चेंडू जडेजाच्या पॅडला जाऊन धडकला. अंपायरने त्याला बाद घोषित केलं. (Latest sports updates)

अंपायरने बाद घोषित केल्यानंतर जडेजाने क्षणाचाही विलंब न करता डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्ये बॅट आणि चेंडूचा संपर्क झाल्याचं दिसून आलं. मात्र त्याचवेळी चेंडू पॅडलाही जाऊन धडकला.त्यामुळे चेंडू नक्की कुठे जाऊन लागला हे कळून येत नव्हतं. मात्र अंपायरने निर्णय न बदलता जडेजाला बाद घोषित केलं.

ravindra jadeja
IND vs ENG 1st Test: जडेजा,राहुल अन् जयस्वालची 'यशस्वी' अर्धशतकं! पहिल्या डावात टीम इंडियाची इंग्लंडवर मोठी आघाडी

भारतीय संघाने घेतली १९० धावांची आघाडी..

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ४३६ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना जडेजाने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर केएल राहुल ८६ आणि यशस्वी जयस्वाल ८० धावांची खेळी करत माघारी परतला. दरम्यान इंग्ंलडने पहिल्या डावात फलंदाजी करताना २४६ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून फलंदाजी करताना कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली.

ravindra jadeja
IND vs ENG: जडेजा बनला टीम इंडियाचा संकटमोचक! अर्धशतक झळकावताच केलं हटके सेलिब्रेशन - VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com