IND vs SA, 1st Test 1st Innings: 'सेन्चुरियनचा सेन्चुरियन' बनला KL Rahul; शतक झळकावत मोडले हे मोठे रेकॉर्ड्स

KL Rahul Century: या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना केएल राहुल संकटमोचक बनत मदतीला धावून आला आहे.
kl rahul
kl rahultwitter
Published On

India vs South Africa 1st Test, Records Made By KL Rahul Century:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे.या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन्या सुपरस्पोर्ट्स पार्कवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना केएल राहुल संकटमोचक बनत मदतीला धावून आला आहे. इतर संघातील फलंदाजी मोठी खेळी करण्यात फ्लॉप ठरले, अशावेळी केएल राहुलने शतकी खेळी केली आहे.

केएल राहुलचं झुंजार शतक...

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने एकापाठोपाठ विकेट्स घेत भारतीय संघाला बॅकफुटवर ठेवलं होतं.

मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केएल राहुलने शार्दुल ठाकुर आणि खालच्या फळीतील फलंदाजांसोबत मिळून एक बाजू धरुन ठेवली. त्याने पहिल्या दिवशी फलंदाजी करताना भारतीय संघाची धावसंख्या २०८ धावांपर्यंत पोहचवली होती.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने १३३ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि ४ षटकार मारले. ९५ धावांवर फलंदाजी करत असताना त्याने षटकार मारत आपलं शतक पू्र्ण केलं. (Latest sports updates)

kl rahul
Ind vs Sa 1st Test: पहिल्याच दिवशी संघाला मोठा धक्का! कर्णधाराला दुखापतीमुळे सोडावं लागलं मैदान

हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ८ वे शतक ठरले आहे. तसेच सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचं हे पहिलंच शतक ठरलं आहे. केएल राहुलने याआधी याच मैदानावर खेळताना शतक पूर्ण केलं होतं. तसेच या मैदानावर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दोन शतकं झळकावाणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रिषभ पंतने असा कारनामा केला होता.

kl rahul
Ind vs SA, 1st Test: BCCI ने केलेली ही एक चूक टीम इंडियाला पडू शकते महागात! यंदाही मालिका जिंकणं कठीण?

भारताचा डाव २४५ धावांवर संपुष्टात..

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. यशस्वी जयस्वाल १७, रोहित शर्मा ५, शुभमन गिल २, विराट कोहलीने ३८ आणि केएल राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. तर आर अश्विन ८, शार्दुल ठाकुर २४, जसप्रीत बुमराह १, मोहम्मद सिराज ५ आणि प्रसिद्ध कृष्णा शून्यावर माघारी परतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com