भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्सपार्कच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे.
दरम्यान पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमा पहिल्याच दिवशी दुखापतग्रस्त झाला आहे. आता तो पुढे या सामन्यात खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी टेम्बा बावूमा दुखापतग्रस्त झाला आहे. त्याला हॅम्स्ट्रिंगच्या त्रासामुळे मैदान सोडावं लागलं आहे. विराट कोहलीने मारलेला कव्हर ड्राईव्ह अडवण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली आहे. भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना २० व्या षटकात त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. (Temba Bavuma Injury Update)
ही दुखापत झाल्यानंतर त्याचा स्कॅन करण्यात आला. यामध्ये त्याला हॅम्स्ट्रिंगची समस्या असल्याचं दिसून आलं आहे. त्याला मैदानात खेळण्यासाठी उतरण्यापूर्वी रोज डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असणार आहे. टेम्बा बावूमा दुखापतग्रस्त झाल्यानंतर फिजिओने त्याला मैदानाबाहेर नेलं. दरम्यान त्याच्याऐवजी डीन एल्गर संघाचं नेतृत्व करताना दिसून येत आहे. (Latest sports updates)
टेम्बा बावूमाने मैदान सोडल्यानंतर डीन एल्गरने कार्यवाहक कर्णधार म्हणून कार्यभार स्वीकारला. ही डीन एल्गरच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका आहे. या मालिकेपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.
तर या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत भारताने ८ गडी बाद २०८ धावा केल्या आहेत. केएल राहुल ७० धावांवर नाबाद आहे. तर दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक ५ गडी बाद केले आहेत. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने हा सामना लवकर थांबवण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.