IND vs SA Test 1 : पहिल्याच दिवशी टीम इंडियाची 'कसोटी' लागली; फलंदाज घसरले, पावसाने सावरले, धावसंख्या कशीबशी २०० पार

India vs South Africa 1st Test Day-1: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान कसोटी सामना मंगळवारी सेंच्युरियनमध्ये सुरु आहे. प्रथम फलंदाजी आमंत्रण मिळाल्यावर टीम इंडियाने ८ गडी गमावून २०८ धावा पूर्ण केल्या आहेत.
India vs South Africa 1st Test
India vs South Africa 1st TestTwitter
Published On

India vs South Africa 1st Test Day-1:

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान कसोटी सामना मंगळवारपासून सेंच्युरियनमध्ये सुरु झाला आहे. प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यावर सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने ८ गडी गमावून २०८ धावा पूर्ण केल्या आहेत. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्ण झाला नाही. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या दिवशी ऑल आऊट होण्यापासून वाचली. (Latest Marathi News)

यष्टीरक्षक केएल राहुलने कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरोधात दमदार अर्धशतक ठोकलं. राहुलच्या नाबाद ७० धावा झाल्या आहेत. मोहम्मद सिराज क्रिझवर असून त्याची एकही धाव झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने ५ गडी बाद केले आहेत. तर भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा पहिला कसोटी सामना आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

India vs South Africa 1st Test
Ravindra Jadeja: रोहितने जडेजाला डच्चू का दिला? समोर आलं मोठं कारण

राहुल आणि शार्दुलची चांगली भागीदारी

टीम इंडियाने लंचपर्यंत ३ गडी गमावून ९१ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा (५), यशस्वी जयस्वाल(१७) , शुभमन गिल (२) हे तिघेही लवकर तंबूत परतले. तर श्रेयस अय्यर ३१ धावांवर त्रिफळाचित झाला. विराट कोहली देखील फार वेळ मैदानावर टिकला नाही. कगिसो रबाडाने विराटला झेलबाद केले. कोहली ३८ धावांवर बाद झाला.

टीम इंडियाला सहावा धक्का विकेट रविचंद्रन अश्विनच्या (8) रुपाने बसला. शार्दुल ठाकूर २४ धावांवर बाद झाला. शार्दुल आणि केएल राहुलने सातव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर जसप्रित बुमराह १ धावांवर बाद झाला.

India vs South Africa 1st Test
IND vs SA, Test Series: ईशान किशनने कसोटी मालिकेतून माघार का घेतली? धक्कादायक कारण आलं समोर

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दक्षिण आफ्रिका- डीन एल्गर, ऐडन मार्क्रम, टोनी दे झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहम, कायल वेर्रेन्ने (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, जेराल्ड कोएत्झी, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर

भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com