भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी प्लेइंग ११ ची घोषणा केली. ही घोषणा करताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Ravindra Jadeja Injury Update)
प्लेइंग ११ मधून रविंद्र जडेजाचं नाव गायब होतं. रोहितने जडेजाला संधी का दिली गेली नाही यामागचं कारणही सांगितलं. पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी रविंद्र जडेजाच्या कंबरेतील मांसपेशी खेचल्या गेल्या आहेत.
त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्याऐवजी आर अश्विनला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे. आर अश्विनसह शार्दुल ठाकुरचाही प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसह फलंदातीतही मोलाचं योगदान देताना दिसून येऊ शकतात. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला या सामन्यातून प्लेइंग ११ मध्ये पदार्पण करण्याची संधी दिली गेली आहे. (Latest sports updates)
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
दक्षिण आफ्रिका- डीन एल्गर, ऐडन मार्क्रम, टोनी दे झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहम, कायल वेर्रेन्ने (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, जेराल्ड कोएत्झी, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.