Ind vs Sa, 1st Test: भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत मोडले जाणार हे मोठे रेकॉर्ड्स

India vs South Africa, 1st Test Records: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून प्रारंभ होणार आहे.
r ashwin and shubman gill
r ashwin and shubman gillgoogle
Published On

Ind vs Sa 1st Test :

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून प्रारंभ होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत पराभूत करण्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे.

तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ मायदेशातील आफला रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंना मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराज दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज बनू शकतो. तर भारताचा फिरकीपटू आर अश्विन कसोटीत ५०० गडी बाद करण्याच्या वाटेवर आहे.

शुभमन गिल या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसूने येऊ शकतो. या मालिकेत मोठा कारनामा करण्यापासून तो केवळ ३४ धावा दुर आहे. ३४ धावा करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्णक करणार आहे. (Latest sports updates)

r ashwin and shubman gill
IND vs SA: पराभवाची मालिका थांबणार का? ३१ वर्षांची प्रतिक्षा संपवण्यासाठी टीम इंडिया मैदानात;पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरु शकतो. त्याने आतापर्यंत कसोटीत १५८ गडी बाद केले आहेत. तर सर्वात यशस्वी गोलंदाज बनण्यासाठी त्याला केवळ १३ गडी बाद करायच्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमाला कसोटी क्रिकेटमध्ये ३ हजार धावा पूर्ण करायची संधी आहे. हा कारनामा करण्यासाठी त्याला केवळ ३ धावांची गरज आहे.

दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे फिरकीपटू आर अश्विनला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळणं जरा कठीण दिसतंय. मात्र जर त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली तर, अवघे ९ गडी बाद करताच तो कसोटीत ५०० गडी बाद करण्याचा कारनामा करु शकतो.

r ashwin and shubman gill
IND vs SA, 1st Test Live Streaming: आजपासून रंगणार 'बॉक्सिंग डे' कसोटीचा थरार! इथे पाहा फुकटात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com