Ravindra Jadeja: कुंबळे- युवराजला मागे सोडत जडेजा बनला नंबर १! मोडला वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड

Ravindra Jadeja Record: रविंद्र जडेजाने वर्ल्डकप स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
ravindra jadeja record
ravindra jadeja recordtwitter/bcci
Published On

Ravindra Jadeja Breaks Anil Kumble And Yuvraj Singh Record:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने नेदरलँडवर १६० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार खेळ केला.

या सामन्यात गोलंदाजी करताना रविंद्र जडेजाला केवळ १ विकेट घेता आली. ही एकमेव विकेट त्याच्यासाठी विक्रमी ठरली आहे. कारण वर्ल्डकप स्पर्धेतील मोठ्या विक्रमात त्याने युवराज सिंग आणि अनिल कुंबळेसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे सोडलं आहे.

रविंद्र जडेजाच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद..

नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात घेतलेली एकमेव विकेट ही रविंद्र जडेजाची वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १६ वी विकेट ठरली आहे. यासह तो एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

याबाबतीत त्याने अनिल कुंबळे आणि युवराज सिंगला मागे सोडलं आहे. अनिल कुंबळे यांनी १९९६ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत १५ विकेट्स घेतल्या होत्या. तर युवराज सिंगने २०११ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत १५ विकेट्स घेतल्या होत्या. आता १६ विकेट्स घेत त्याने या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. (Latest sports updates)

एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे फिरकी गोलंदाज...

१६ विकेट्स - रविंद्र जडेजा (२०२३)*

१५ विकेट्स- अनिल कुंबळे (१९९६)

१५ विकेट्स- युवराज सिंग (२०११)

१४ विकेट्स - कुलदीप यादव (२०२३)

१४ विकेट्स - मनिंदर सिंग (१९८७)

ravindra jadeja record
IND vs NZ Semi Final: सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित? न्यूझीलंडची डोकेदुखी वाढवणारी आकडेवारी एकदा पाहाच

भारतीय संघाचा सलग नववा विजय..

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ९ पैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. नेदरलँडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने सर्वाधिक १२८ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने १०२ धावा चोपल्या. ५० षटक अखेर भारतीय संघाने ४ गडी बाद ४१० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा डाव २५० धावांवर संपुष्टात आला.

ravindra jadeja record
IND vs NED: टीम इंडियाकडून धावांची आतिषबाजी! केएल राहुल-श्रेयस अय्यरची शतकी खेळी, नेदरलँडसमोर ४११ धावांचं आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com