वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले असून आता बाद फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ४ संघांनी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
या स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या वानखेडेवर कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड.
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्येही आमने सामने आले होते. या सामन्यापूर्वी भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये होता. मात्र सेमीफायनलमध्ये टॉप ऑर्डरचा फ्लॉप शो आणि धोनीच्या रन आउटमुळे भारतीय संघाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न हुकलं होतं.
सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान आता भारतीय संघाला पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे.
वानखेडेवर कसा राहियाल दोन्ही संघांचा रेकॉर्ड?
सेमीफायनलचा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. वर्ल्डकप भारतात होत असल्याने भारतीय संघाला होम अडवांटेज असणार आहे. तर वानखेडेवर भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. १९८७ पासून ते २०२३ पर्यंत भारतीय संघाने वानखेडे स्टेडियमवर २१ सामने खेळले आहेत.
यादरम्यान भारतीय संघाला १२ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाची विजयाची सरासरी ५५ टक्के इतकी राहिली आहे. (Latest sports updates)
तर न्यूझीलंडचा या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला तर न्यूझीलंडने २ पैकी १ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत २६ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १५ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ११ वेळेस बाजी मारली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.