भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. नेदरलँडविरुद्धचा हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एकमेव षटकार मारताच विक्रम मोडून काढला आहे. त्याने मोठ्या विक्रमात डिविलियर्सला मागे सोडलं आहे.
रोहितचा मोठा रेकॉर्ड..
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली.
नेदरलँडकडून सातवे षटक टाकण्यासाठी एकरमन गोलंदाजीला आला होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहितने खणखणीत षटकार मारला. हा त्याचा २०२३ वर्षातील ५९ वा षटकार ठरला.
यासह त्याने वनडे एकाच वर्षात सर्वाधिक षटकार (Most Sixes In Calendar Year) मारण्याच्या विक्रमात एबी डिविलियर्सला मागे सोडलं आहे. डिविलियर्सने २०१५ मध्ये एकाच वर्षात ५८ षटकार मारले होते. (Latest sports updates)
कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार..
भारताचा हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. रोहित शर्मा एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.
रोहितने आपर्यंत या स्पर्धेत एकूण २३ षटकार मारले आहेत. या बाबतीत त्याने इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनला मागे सोडलं आहे. ओएन मॉर्गनच्या नावे २२ षटकार मारण्याची नोंद आहे. तर एबी डिविलियर्सने २१ षटकार मारले होते.
एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे कर्णधार..
रोहित शर्मा - २३* षटकार, २०२३
ओएन मॉर्गन -२२ षटकार, २०१९
एबी डिविलियर्स - २१ षटकार, २०१५
आरोन फिंच - १८ षटकार, २०१९
ब्रेंडन मॅक्क्युलम - १७ षटकार, २०१५
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.