IND vs SA, Test Series: ईशान किशनने कसोटी मालिकेतून माघार का घेतली? धक्कादायक कारण आलं समोर

Ishan Kishan News: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून ईशान किशनने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे माघार घेण्याचं कारण? जाणून घ्या.
ISHAN KISHAN
ISHAN KISHAN Google
Published On

Ishan Kishan, Ind vs Sa Test Series:

वनडे आणि टी -२० मालिका झाल्यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला कसोटी सामना येत्या २६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे.

दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. BCCI ने यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी केएस भरतला संघात स्थान दिलं गेलं आहे. यामागचं कारणही समोर आलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ईशान किशनने बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटसोबत चर्चा केली. त्याला मानसिकदृष्ट्या थकवा जाणवत असल्याने काही दिवस क्रिकेटपासून दुर राहायचं आहे. त्याने बीसीसीआयला सांगितलं आणि बीसीसीआयनेही त्याच्या विनंतीला मान देत त्याला विश्रांती दिली आहे. (Latest sports updates)

ISHAN KISHAN
IND vs SA,3rd ODI: 'सिंग इज किंग', द.आफ्रिकेत अर्शदीपचा मोठा कारनामा; अनिल कुंबळेंच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

मानसिकदृष्ट्या थकवा येण्याचं कारण काय?

ईशान किशन गेल्या एक वर्षापासून भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतोय. त्याला वनडे,टी-२० आणि कसोटी संघात सातत्याने संधी दिली जात आहे. तो मायदेशात आणि परदेशात सतत प्रवास करतोय.

त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने संधीचं सोनं करुन दाखवलं. मात्र त्याचं संघातील स्थान निश्चित नव्हतं. जेव्हा एखादा खेळाडू उपलब्ध नसेल किंवा दुखापतग्रस्त असेल तेव्हा त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जातं. नेहमी सामना खेळण्यासाठी तयार असणं आणि शेवटच्या क्षणी प्लेइंग ११ मध्ये स्थान न मिळणं, हे देखील मानसिकदृष्ट्या थकवा येण्याचं कारण असू शकतं.

ISHAN KISHAN
IND vs SA,3rd ODI: 'सिंग इज किंग', द.आफ्रिकेत अर्शदीपचा मोठा कारनामा; अनिल कुंबळेंच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार का?

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेतही ईशान किशनला संधी मिळणं कठीण आहे. कारण केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत दिसेल. त्यामुले या मालिकेतही त्याला बाकावर बसून राहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com