Ind vs SA, 1st Test: BCCI ने केलेली ही एक चूक टीम इंडियाला पडू शकते महागात! यंदाही मालिका जिंकणं कठीण?

India vs South Africa, 1st Test Match Series (December 2023): दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाज साजेसा खेळ करू शकलेले नाहीत. एकट्या केएल राहुलला वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही.
India vs South Africa, 1st Test Match 2023: Cheteshwar Pujara Not Selected in Test Squad
India vs South Africa, 1st Test Match 2023: Cheteshwar Pujara Not Selected in Test Squadgoogle
Published On

Cheteshwar Pujara Not Selected In Test Squad:

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाज साजेसा खेळ करू शकलेले नाहीत. एकट्या केएल राहुलला वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही.

भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला शुभमन गिल या सामन्यातही फ्लॉप ठरला . त्याला १२ चेंडूत अवघ्या २ धावा करता आल्या. संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर केल्यानंतर शुभमन गिलला संघात स्थान दिलं गेलं आहे.

वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये हिट असलेला शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये स्वतः ला सिद्ध करू शकलेला नाही. भारताचा संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर असताना यशस्वी जयस्वालला ओपनिंग तर गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला ४ डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याला ६,१०,२९* आणि २ अशा धावा करता आल्या आहेत. त्याचा फ्लॉप हा भारतीय संघाची चिंता वाढवतोय. असंही म्हटलं जातं आहे की, चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर ठेवणं ही भारतीय संघ व्यवस्थापकांनी केलेली सर्वात मोठी चूक आहे. (Latest sports updates)

India vs South Africa, 1st Test Match 2023: Cheteshwar Pujara Not Selected in Test Squad
Ind vs Sa 1st Test: पहिल्याच दिवशी संघाला मोठा धक्का! कर्णधाराला दुखापतीमुळे सोडावं लागलं मैदान

तिसऱ्या क्रमांकावर गिल फ्लॉप..

भारतीय संघात काही नवख्या खेळाडूंना संधी दिली गेली आहे. ज्यांना या खेळपट्टीचा अंदाज नाही. उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर तो अवघ्या २ धावा करू शकला. जर या दौऱ्यावर चेतेश्वर पुजाराची निवड झाली असती, तर त्याने एक बाजू धरून ठेवली असती .

याचा फायदा संघावरील प्रेशर कमी करण्यासाठी झाला असता. कसोटी क्रिकेटमध्ये पुजारा हा भारतीय संघासाठी हिट ठरला आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४३.६० च्यास सरासरीने ७१९५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला ३५ अर्धशतकं आणि १९ शतकं झळकावण्यात यश आले आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मात्र केएल राहुलला सोडलं तर इतर कुठल्याही फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. केएल राहुल ७० धावांवर नाबाद आहे. तर दुसरीकडे कगिसो रबाडाने ५ गडी बाद केले आहेत.

India vs South Africa, 1st Test Match 2023: Cheteshwar Pujara Not Selected in Test Squad
IND vs SA: कगिसो रबाडाची दमदार गोलंदाजी! दक्षिण आफ्रिकेसाठी पूर्ण केल्या ५०० विकेट्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com