Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाच्या कमबॅकची प्रतीक्षा लांबणीवर! दुखापतीबाबत समोर आली मोठी अपडेट

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यापूर्वी रविंद्र जडेजाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ravindra jadeja
ravindra jadejatwitter
Published On

Ravindra Jadeja Injury Update:

सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. पहिला कसोटी सामना झाल्यानंतर बीसीसीआयने प्रेस रिलीझमध्ये म्हटले होते की, रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja Injury) दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. मात्र तो आता संपूर्ण मालिकेतून बाहेर होणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.

सध्या रविंद्र जडेजा बंगळुरुतील एनसीएमध्ये असून, त्याची दुखापत गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रविंद्र जडेजाचं या मालिकेत कमबॅक करणं कठीण आहे. या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, मायदेशात खेळताना रविंद्र जडेजा हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडू असतो. मात्र तो उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळणार की नाही हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जडेजाला पूर्णपणे फिट होण्यासाठी आणखी वेळ लागु शकतो. (Latest sports updates)

ravindra jadeja
IND vs ENG 2nd Test: दुसऱ्या सामन्यापूर्वीच इंग्लंडच्या ताफ्यात भीतीचं वातावरण! या कारणामुळे बेन स्टोक्सचं टेन्शन वाढलं

पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी..

मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या सामन्यात रविंद्र जडेजाकडून अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली आहे.

त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले. तर फलंदाजी करताना पहिल्या डावात त्याने ८७ धावांची खेळी केली होती. यासह क्षेत्ररक्षणातही त्याने बहुमूल्य योगदान दिलं होतं. मात्र दुसऱ्या डावात वेगाने धाव घेत असताना त्याचे स्नायू खेचले गेले.

ravindra jadeja
IND vs ENG 2nd Test: 'दुष्काळात तेरावा महिना..',दुसऱ्या कसोटी सामन्यापू्र्वी रोहित शर्माचं टेन्शन वाढलं

त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं आहे. त्याच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिलं गेलं आहे. आता तो केव्हा कमबॅक करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जडेजासह केएल राहुल देखील दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. केएल राहुल आणि जडेजा संघाबाहेर झाल्यानंतर सरफराज खान,सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिलं गेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com